विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार?

Published : May 20, 2024, 01:42 PM IST
HSC Result

सार

विद्यार्थ्यांना उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावीच्या निकाल पाहता येईल. त्यानंतर महाविद्यालयांमध्ये त्यांना गुणपत्रिका वितरीत केल्या जातील. 

बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरत असते. बारावीच्या टक्केवारीनंतर पुढे कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा किंवा उच्च शिक्षणासाठी कोणती शाखा निवडायची, याबद्दल विद्यार्थी आणि पालकांची दिशा निश्चित होत असते. त्यामुळे बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. परिणामी बारावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व असते. त्यामुळे आता उद्या जाहीर होणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात काय समोर येणार, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

बारावीचा निकाल कुठे पाहता येणार?

1. www.mahresult.nic.in

2. http://hscresult.mkcl.org

3. www.mahahsscboard.in

4. https://results.digilocker.gov.in

5. http://results.targetpublications.org

ऑनलाईन निकाल कसा पाहाल?

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.

निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in अधिकृत संकेतस्थळाचा किंवा अन्य वेबसाईटचा वापर करता येईल.

वेबसाईटच्या होमपेजवर गेल्यानंतर महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2024 या ऑप्शनवर क्लिक करा.

हा ऑप्शन क्लिक केल्यावर तुम्हाला समोर तुमचा सीट क्रमांक अथवा परीक्षा क्रमांक टाकण्याचा ऑप्शन दिसेल. काही संकेतस्थळांवर तुम्हाला रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती विचारली जाईल. ही माहिती भरुन सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Winter Session Nagpur 2025 : हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची BJP करणार मागणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकरण पुन्हा ऐरणीवर
Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती