राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम यांच्यावरून वादग्रस्त विधान केले होते. पण आता जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन आपण केलेल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे.
Jitendra Awhad's Comment : येत्या 22 जानेवारीला (2024) अयोध्येतील रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. अशातच राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम (Lord Ram) यांच्यावरून एक वादग्रस्त विधान केले होते. यामुळे आव्हाडांच्या विरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. आव्हाड यांनी आपल्या विधानात प्रभू रामांना, ते मांसाहारी असल्याचे म्हटले होते.
रिपोर्ट्सनुसार, आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांवरून केलेल्या विधानावर खेद व्यक्त केला. पण आव्हाड यांनी पुढे म्हटले की, "प्रभू रामांबद्दलचे वाक्य ओघात बोलून गेलो. मी इतिहासाचा विपर्यास कधीच करत नाही. प्रभू रामांबद्दलचा वाद मला अधिक वाढवायचा नाही. याशिवाय मला कोणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या."
दरम्यान आव्हाडांनी प्रभू रामांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या विरोधात भाजपाकडून एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात पत्रकारांनी आव्हांना विचारले असता आव्हाडांनी म्हटले की, माझ्या विरोधात अमेरिकेतही गुन्हा दाखल केला तरीही मी कोणत्याही गुन्हांना घाबरणारा व्यक्ती नाही. मी जे बोलते ते अभ्यास करून बोलतो. मी अर्थहीन बोलत नाही आणि ही माझी सवय देखील नसल्याचे आव्हाडांनी म्हटले.
नक्की काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
शिर्डीत (Shirdi) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू रामांवरून एक वादग्रस्त विधान केले होते. आव्हाडांनी प्रभू राम हे मांसाहारी असल्याचे म्हटले होते. याशिवाय 14 वर्षे जंगताल राहून कोण शाकाहारी राहतं का? असे विधानही प्रभू रामांबद्दल आव्हाड यांनी केले होते.
जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानावरून संताप व्यक्त
जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानावरून पुणे येथे आंदोलन करण्यात आले. याशिवाय आव्हाडांनी प्रभू रामांवरून केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेधही करण्यात आला. दुसऱ्या बाजूला मुंबई भाजपा नेते राम कदम (Ram Kadam) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रारही केली.
आणखी वाचा:
Palghar : पालघरमध्ये अल्पवयीन मुलीची गळा दाबून हत्या, आरोपींना अटक
Ram Mandir : रामललांच्या दर्शनासाठी मुंबईत ते अयोध्यापर्यंत शबनमचा पायी प्रवास, कोण आहे ही तरूणी?