Aurangabad Fire : औरंगाबाद येथील फॅक्टरीला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

औरंगाबाद येथील एका फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या दुर्घटनेत सहा जणांना होरपळून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे.

Chanda Mandavkar | Published : Dec 31, 2023 4:05 AM IST / Updated: Jan 04 2024, 10:50 AM IST

Aurangabad Fire : औरंगाबाद येथे रविवारी (31 डिसेंबर, 2023) मध्यरात्री हॅन्ड ग्लोव्हज बनवणाऱ्या एका फॅक्टरीला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC) परिसरात असलेल्या हॅन्ड ग्लव्सच्या फॅक्टरीला (Hand Gloves Factory) मध्यरात्री 2 वाजून 15 मिनिटांनी आग लागली. फॅक्ट्रीला आग लागल्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळी मोठ्या संख्येने अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अग्निशनमन दलाच्या अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले की, आम्हाला रात्री फॅक्टरीला आग लागल्याचा फोन आला होता. त्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण फॅक्टरीला आग लागली होती. फॅक्टरीजवळ राहणाऱ्या स्थानिकांनी सांगितले, आतमध्ये सहा जण अडकले गेले आहेत.

अग्शिनम दलाच्या अधिकाऱ्यांनी फॅक्टरीत अडकलेल्या कामगारांचा जीव वाचवण्यआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळावरून सहा कामगारांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. आता फॅक्ट्रीला लागलेली आग विझवण्याचे कार्य सुरू आहे.

या घटनेसंबंधित कामगारांनी सांगितले की, ज्यावेळी आग लागली तेव्हा फॅक्टरी बंद होती आणि ते झोपले होते. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, "आग लागल्यानंतर आतमध्ये 10-15 कामगार झोपले होते. काहींना आग लागल्यानंतर तेथून पळ काढण्यास यश आले. पण कमीतकमी पाच-सहा जण आतमध्येच अडकले गेले."

आणखी वाचा: 

New Year Celebration : नववर्षाच्या सेलिब्रेशनवर नवी मुंबई पोलिसांची असणार करडी नजर, नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई

Covid JN1 Variant : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका, मुख्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत नागरिकांना मास्क वापरण्याचे केले आवाहन

Thane Crime : पतीने संशयातून पत्नीसह मुलांची केली निर्घृण हत्या, तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं

Share this article