Published : Oct 15, 2025, 08:37 AM ISTUpdated : Oct 15, 2025, 01:31 PM IST
नक्षलवादी नेता भूपती : माओवाद्यांचा प्रमुख नेता मल्लोजूला वेणुगोपाल राव याने ५० सहकाऱ्यांसोबत गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोलीच्या इतिहासातील हे सर्वात मोठे आत्मसमर्पण आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसर्पण, ६ कोटींचे बक्षीस कोणाला मिळणार?
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा नक्षलवाद्यांमुळे कायमच चर्चेत येत असतो. या ठिकाणी अनेकवेळा नक्षलवाद्यांनी हल्ले घडवून आणले आहेत. गडचिरोली पोलीस आणि महाराष्ट्रातील गृह खात्याला फार मोठं यश प्राप्त झालं आहे.
26
माओवाद्यांचा प्रमुख नेता मल्लोजूला वेणुगोपाल राव याने केलं आत्मसमर्पण
माओवाद्यांचा प्रमुख नेता मल्लोजूला वेणुगोपाल राव याने आपल्या सहकाऱ्यांसोबत आत्मसमर्पण केलं आहे. त्याने त्याच्या ५० सहकाऱ्यांसोबत पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं.
36
गडचिरोलीच्या इतिहासातील सर्वात मोठं आत्मसमर्पण
गडचिरोलीच्या नक्षल इतिहासातील हे सर्वात मोठं आत्मसमर्पण ठरलं आहे. काल (14 ऑक्टोबर) रात्री दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलात छत्तीसगड सीमेलगत महाराष्ट्राच्या बाजूने हे सामूहिक आत्मसमर्पण झाले आहे.
६ कोटींचे बक्षीस असलेला नक्षलवादी पोलिसांच्या ताब्यात
सहा कोटींचे बक्षीस असलेल्या मल्लोजुला रावसह 61 नक्षलवाद्यांनी आज बुधवारी शरणागती पत्करली. यामुळे नक्षलवाद्यांच्या चळवळीला फार मोठा धक्का बसणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरचा नियोजित दौरा सोडून गडचिरोलीत दाखल झाले आहेत.
56
मुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीतील कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपने २०२६ पर्यंत माओवादी आणि नक्षलवादी चळवळ समाप्त करण्याचे लक्ष ठेवले आहे. ही शरणागती यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
66
मुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमाला का उपस्थित राहणार?
मुख्यमंत्री फडणवीस हे उपस्थित राहिले तरच मी शरणागती पत्करेल असं नक्षलवाद्यांचा नेता भूपतीने म्हटलं होत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचा दौरा रद्द करून आपला मोर्चा सोलापूरकडे वळवला आहे.