Ladki Bahin Yojana: ई-केवायसीबाबत मोठी घोषणा, अदिती तटकरे काय म्हणाल्या?; जाणून घ्या

Published : Oct 14, 2025, 04:42 PM IST

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेतील सर्व्हरमध्ये सुधारणा झाल्यामुळे आता दररोज ५ लाख महिलांची प्रक्रिया पूर्ण होत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदत असून, सरकारने फेक वेबसाईट्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

PREV
16
सर्व्हरमध्ये सुधारणा, आता दररोज ५ लाख ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण!

ठाणे: मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांसाठी सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला तांत्रिक अडचणींमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत होता, पण आता सरकारने ई-केवायसीच्या सर्व्हरमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, दररोज जवळपास चार ते पाच लाख महिलांची ई-केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण केली जात आहे. आतापर्यंत १ कोटी १० लाखांहून अधिक महिलांची प्रक्रिया पूर्ण झाली असून २.५ लाखांपेक्षा जास्त महिलांची प्रक्रिया ९०% पूर्ण झाली आहे. 

26
ई-केवायसीसाठी अंतिम मुदत, नोव्हेंबर पर्यंत, पूरग्रस्तांना अतिरिक्त १५ दिवसांची सवलत!

लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य असून, ती पूर्ण करण्यासाठी महिलांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच, पूरग्रस्त भागांतील महिलांसाठी ही वेळ १५ दिवसांनी वाढवण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले. 

36
फेक वेबसाईटपासून सावध!, हीच आहे अधिकृत ई-केवायसी लिंक

महत्वाचे म्हणजे, काही फेक वेबसाईट्स Google वर सर्च करताना पुढे येत आहेत. त्या फेक वेबसाईट्स न जाता तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा. ई-केवायसीसाठी फक्त ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc अधिकृत वेबसाईट वापरा. 

46
OTP न येणे आणि आधार बाबत अडचणी

ई-केवायसी करताना महिलांना OTP न मिळणे, वेबसाईट डाउन होणे, किंवा पती/वडिलांचे आधार क्रमांक नसणे यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. काही महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, अशा परिस्थितीत आधार क्रमांक कोणाचा द्यायचा? यावर सरकार लवकरच तोडगा देईल, अशी अपेक्षा आहे. 

56
लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी कशी कराल?

अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

https://ladakibahin.maharashtra.gov.in

होमपेजवर "e-KYC" बॅनरवर क्लिक करा.

तुमचा आधार क्रमांक व कॅप्चा टाका, आणि "Send OTP" वर क्लिक करा.

OTP येताच तो टाका आणि "Submit" करा.

आधार पात्र यादीत असल्यास, पुढे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका.

OTP आणि सबमिटनंतर, जात प्रवर्ग निवडा, आणि खालील बाबी डिक्लेअर करा.

कुटुंबातील कोणीही सरकारी कर्मचारी नाही.

कुटुंबातील एकच विवाहित व एकच अविवाहित महिला लाभ घेते.

"Submit" वर क्लिक केल्यावर, यशस्वी केवायसीचा मेसेज मिळेल.

"Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे". 

66
केवळ अधिकृत वेबसाईटवरूनच आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करा

‘लाडकी बहीण योजना’ ही राज्यातील महिलांसाठी मोठा आधार बनली आहे. ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, महिलांनी केवळ अधिकृत वेबसाईटवरूनच आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. कोणत्याही फसवणुकीपासून दूर राहा आणि वेळेत नोंदणी पूर्ण करा.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories