Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने १५ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील अनेक भागांत पुन्हा पावसाचा इशारा दिलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील एकूण २३ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई: राज्यात काही दिवस उन्हाळी वातावरणानंतर पुन्हा एकदा पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. येत्या १५ ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे एकूण २३ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
27
कोकण विभाग
मुंबई आणि पालघरमध्ये वातावरण कोरडे राहणार आहे.
ठाणे आणि रायगडमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी.
37
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता.
शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामानात होणाऱ्या अचानक बदलांमुळे नागरिकांनीही आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाचा परतीचा मोसम सुरू असून, हा पाऊस शेवटचा की पुन्हा काहीतरी अनपेक्षित घडणार? हवामान खात्याच्या पुढील अपडेट्सकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.