Maulana Salman Azhari Arrested : गुजरातमध्ये द्वेषपूर्ण भाषण केल्याने मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक, समर्थकांनी घातला गदारोळ

मुंबईतील मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांनी 31 जानेवारी (2024) रात्री गुजरातमध्ये द्वेषपूर्ण भाषण केल्याने त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अझहरी यांना अटक केल्यानंतर समर्थकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली.

Chanda Mandavkar | Published : Feb 5, 2024 6:59 AM IST / Updated: Feb 05 2024, 12:33 PM IST

Maulana Salman Azhari Arrested : गुजरातमधील जुनागड (Junagadh) येथे मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांनी कथित रुपात द्वेषपूर्ण भाषण केल्याने पोलिसांनी रविवारी (4 फेब्रुवारी) त्यांना अटक केली आहे. या घटनेनंतर राज्यातील पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. अजहरी यांना मुंबईतील घाटकोपर पोलीस स्थानकात ठेवण्यात आले आहे. अशातच पोलीस स्थानकाबाहेर अझहरी यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचेही सांगण्यात येत आहे.

मुफ्ती सलमान अझहरी यांच्या अटकेनंतर कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी पोलिसांकडून कठोर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, धर्मगुरूंच्या तपासात मदत करण्यास तयार असल्याचे अझहरी यांच्या वकिलांनी म्हटले. या संबंधित पोलिसांकडून कोणतेही उत्तर आलेले नाही.

अझहरी यांच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर काही पोस्ट शेअर करण्यात आल्या होत्या. या पोस्टमध्ये म्हटले होते की, अझहरी यांना सकाळी 11 वाजून 56 मिनिटांनी गुजरात एटीएस, मुंबई एटीएस आणि घाटकोपरमधील चिराग नगर पोलीस स्थानकातील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. 25-30 पोलीस कर्मचाऱ्यांनी अझहरी यांच्या सोसायटीला घेरले होते.

नक्की काय आहे प्रकरण?
 मुंबईतील मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांनी 31 जानेवारीला रात्री जुनागड जवळील पोलीस स्थानकाजवळ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान अझहरी यांनी कथित द्वेषपूर्ण भाषण केले होते. या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अझहरी यांच्यासह स्थानिक आयोजक मोहम्मद युसूफ मालेक आणि अजीम हबीब ओडेदरा यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 153 B (वेगवेगळ्या धार्मिक समूहांमध्ये द्वेषाला प्रोत्साहन देणे) आणि 505 (2) (जनतेसाठी अनुकूल विधान करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात आधीच दोन स्थानिक आयोजकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी म्हटले की, अझहरी धर्म आणि नशा मुक्तीसंबंधित संबोधन करणार असल्याचे सांगत कार्यक्रमाची परवानगी मागण्यात आली होती.

आणखी वाचा : 

छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले हे विधान, म्हणाले...

BJP MLA Firing : उल्हासनगरमध्ये शिवसेना नेत्यावर गोळीबार, BJP आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक

Crime News : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी नवी मुंबईतील शेफच्या विरोधात गुन्हा दाखल

Share this article