छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले हे विधान, म्हणाले...

राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठ्यांना ओबीसी समाजानुसार आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावरुन ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शिंदे गटातून राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. 

Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal Resign : मराठ्यांना ओबीसी समाजानुसार (OBC) आरक्षण देण्याच्या विरोधात महाराष्ट्रातील राजकरण तापले आहे. अशातच शिंदे सरकारमधील महाराष्ट्राचे मंत्री आणि जेष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केली. यावरुनच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांसंदर्भात एक मोठं विधान केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, भुजबळांच्या राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच (CM Eknath Shinde) व्यवस्थितीत सांगू शकतात. दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भुजबळांच्या राजीनाम्यावरुन प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी म्हटले की, भुजबळांचा राजीनामा हा त्यांच्यामधील आणि भाजपमधील मिलिभगत आहे. दरम्यान, भुजबळांच्या विधानानंतर राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असे राजकरण तापल्याचे दिसून येत आहे.

नक्की काय आहे प्रकरण?
राज्य सरकारने मराठ्यांच्या तापलेल्या आंदोलनावरुन ओबीसी समाजातच मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. यावरुनच छगन भुजबळ यांनी शनिवारी (3 फेब्रुवारी) एका सार्वजनिक रॅलीमध्ये शिंदे सरकारला धक्का देत म्हटले की, 16 नोव्हेंबरला मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

भुजबळांना दावा केलाय की, मराठ्यांना ओबीसी समाजात आरक्षण देणे बेकायदेशीर आहे. सरकारला आरक्षण द्यायचेच असल्यास त्यांनी स्वतंत्र तरतूदी द्याव्यात.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
छगन भुजबळ यांनी सार्वजनिक घोषणा करत राजीनामा दिल्याचे जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी म्हटले की, भुजबळांचा राजीनामा अद्याप स्विकार केलेला नाही. यासंदर्भातील अधिक स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्यवस्थितीत देतील.

संजय राऊतांची प्रतिक्रिया
संजय राऊतांनी म्हटले की, भुजबळांनी राजीनामा दिलाय म्हणतात पण ते मंत्र्यांच्या बैठकीला कसे उपस्थितीत राहत आहेत. याशिवाय भुजबळ आणि फडणवीस यांच्यामध्ये काहीतरी मिलिभगत असल्याचेही राऊत यांनी म्हटले. राऊतांनी पुढे म्हटले की, सर्व समाजाला त्यांचे अधिकार मिळावेत असे आम्हाला वाटते.

भुजबळांवर मनोज जरांगेंचा हल्लाबोल
छगन भुजबळांवर हल्लाबोल करत मनोज जरांगेंनी म्हटले की, “ओबीसी नेते हे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय भुजबळ ज्या कोणत्याही पक्षात जातात त्यांना नुकसान पोहोचवतातच. भुजबळांना राजीनामा द्यायचा असल्यास त्यांनी तो द्यावा. पण मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये असेही जरांगेंनी म्हटले आहे.”

आणखी वाचा : 

मराठा आरक्षणाला ओबीसी कोट्यात स्थान देण्याच्या निषेधार्थ छगन भुजबळ यांचा राजीनामा

BJP MLA Firing : उल्हासनगरमध्ये शिवसेना नेत्यावर गोळीबार, BJP आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक

Manoj Jarange : शंभर टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला मोफत शिक्षण मिळावे, वाचा मनोज जरांगेंच्या जाहीर सभेतील महत्त्वाचे मुद्दे

Share this article