गुढीपाडव्यानिमित्त मुंबई-ठाण्यात वाहतूकीत बदल, नागरिकांना या पर्यायी मार्गाचा वापर करता येणार

आज सर्वत्र गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मुंबई, ठाण्यात मोठ्या प्रमाणात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळतो. अशातच वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.

Chanda Mandavkar | Published : Apr 9, 2024 3:06 AM IST / Updated: Apr 09 2024, 08:44 AM IST

Mumbai-Thane Traffic Advisory : आज (9 एप्रिल) गुढीपाडवा (Gudi Padwa) आणि हिंदू नववर्षाचे (Hindu New Year) स्वागत केले जात आहे. अशातच सर्वत्र सणाची धूम पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याला ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन केले जाते. याशिवाय मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (M यांचा गुढीपाडवा मेळावा असणार आहे. यामुळे नागरिकांची होणारी गर्दी पाहता वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

मुंबईतील वाहतूकीच्या मार्गांमध्ये बदल
मुंबईत आज मनसेचा पाडवा मेळावा असणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग व पूर्व द्रुतगती महामार्गासह कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळेच वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहनांच्या पार्किंगवर निर्बंध घालण्यात आले आहेत. वाहतुकीचे निर्बंध आज दुपारी 1 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहेत.

ठाणे येथील वाहतूकीच्या मार्गांमध्ये बदल 
ठाण्यात आज कोर्टनाका चौक ते जांभळीनाका आणि बाजारपेठेच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ प्रवेश बंदी असणार आहे. या मार्गावरून जाणारी वाहने आनंद आश्रम, टॉवर नाका, तलावपाळीच्या मार्गावरून जाणार आहेत. याशिवाय खासकरआळी पासून जांभळीनाकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना महाजनवाडी सभागृहाजवळ प्रवेश बंदी असणार आहे. याएवजी नागरिकांना महाजनवाडी सभागृहापासून कोर्टनाकाच्या मार्गाने प्रवास करता येणार आहे.

तीन हात नाका, हरिनिवास किंवा मल्हार सिनेमामार्गावरून ठाण्याच्या स्थानकाकडे जाणाऱ्या बसला तीन हाता नाका येथे प्रवेशबंदी असणार आहे. त्याएवजी बस नितीन कंपनी, अल्मेडा रोड, खोपट, टेंभीनाकामार्गे वळवल्या आहेत.

आणखी वाचा : 

सातारा लोकसभा मतदारसंघातील ठरला उमेदवार, शरद पवार शशिकांत शिंदेंना दिली उमेदवारी

Maharashtra Lok Sabha Election 2024 : सांगलीत मतदानादिवशी मजूर, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास मिळणार राज्यपाल पद? नेमकं काय घडतंय भाजपमध्ये, घ्या जाणून

Share this article