महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील काही जागांचा तिढा अजूनही सुटला नाही, त्यामुळे त्या ठिकाणी दोनही आघाड्यांनी अजूनही उमेदवार घोषित केले नाहीत.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील काही जागांचा तिढा अजूनही सुटला नाही, त्यामुळे त्या ठिकाणी दोनही आघाड्यांनी अजूनही उमेदवार घोषित केले नाहीत. आज महाविकास आघाडीची एकत्र पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे हे संबोधित करणार आहेत.
महाविकास आघाडीत कोणत्या जागांवर तिढा?
महाविकास आघाडीमधील काही जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाही. तिथे कोणाला जागा देण्यात यावी यावर अजूनही तीनही पक्षांच एकमत झालेलं दिसत नाही. त्यामध्ये सांगलीची जागा असून येथे शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबईच्या मंत्रालय परिसरातील ठाकरे गटाच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद होणार आहे. सांगली, भिवंडी आणि मुंबईतील इतर जागांवर कोणते उमेदवार राहतील यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे.
सांगलीची जागा शिवसेनेनं परस्पर जाहीर केल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली होती. सांगली लोकसभा मतदारसंघातून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक होते, त्यांनी तसे प्रयत्न चालू ठेवले होते. पण शिवसेनेनं अचानक उमेदवारी जाहीर केल्यामुळे ते आणि विश्वजित कदम हे महाविकास आघाडीतील नेत्यांवर नाराज होते.
आणखी वाचा -
Gudi Padwa 2024 निमित्त मित्रपरिवाराला WhatsApp Message, Wishes, Images पाठवून करा हिंदू नववर्षाची सुरूवात
Chaitra Navratri ला आजपासून सुरूवात, घटस्थापनेसाठी जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी