Marathwada Rain Update : मराठवाड्यात पुन्हा पावसाचे आगमन! 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, 72 तासांसाठी हवामान विभागाचा इशारा

Published : Jul 05, 2025, 09:27 AM ISTUpdated : Jul 05, 2025, 09:28 AM IST

मराठवाडा : मराठवाड्यात पावसाने जोर धरला असून पुढील 72 तासांसाठी हवामान खात्याने इशारा दिला आहे. याशिवाय परभणी, जालना, संभाजीनगरसह हिंगोलीत 30-40 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

PREV
15
मराठवाड्यातील पावसाची स्थिती

राज्यात पुन्हा एकदा मान्सूनने जोर धरला आहे. मराठवाड्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुनरागमन केलं असून, हवामान विभागाने ५ जुलैपासून पुढील ७२ तासांसाठी सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

25
वेगाने वारे वाहण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये भागांमध्ये ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, विजांच्या कडकडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. हवामानात मोठे बदल जाणवत असून, पुढील काही दिवस मराठवाड्यात मुसळधार पावसाचे संकेत मिळत आहेत.

35
बीड, लातूरमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस

बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः ६ जुलैपासून लातूर आणि धाराशिव वगळता इतर सहा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

45
पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम

मराठवाड्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. या काळात शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात पावसाचा अंदाज असल्याने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

55
खरीप पिकांच्या पेरणीसाठी पोषक वातावरण

दरम्यान, मान्सूनच्या पुनरागमनामुळे खरीप पेरणीसाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना आवश्यक असलेला पाऊस मिळणार असल्यामुळे शेती कामांनाही गती येण्याची अपेक्षा आहे.

Read more Photos on

Recommended Stories