मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्यासह नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. अशातच हवमान खात्याने आजचा अंदाज जारी केलाय.
राज्यात कोकण, घाटमाथा आणि विदर्भ भागात पावसाचा जोर कायम असून, आज पुन्हा 21 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर इतर भागांत हलक्याशा सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
27
कोल्हापूर – घाटमाथ्यावर जोरदार पाऊस
मागील 24 तासात कोल्हापूर परिसरात 16 मिमी पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावर आजही ऑरेंज अलर्ट असून, उर्वरित जिल्ह्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 28°C राहण्याचा अंदाज आहे.
37
सातारा – ढगाळ वातावरणात पाऊस
मंगळवारी साताऱ्यात 14 मिमी पाऊस झाला. पुढील 24 तासांत देखील ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी आहे. कमाल तापमान 27°C, किमान 21°C इतकं राहील.
शिवाजीनगर भागात 3.7 मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. पुढील 24 तासांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवली असून घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमाल तापमान 29°C राहील.
57
सोलापूर – तुरळक पावसाची शक्यता
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 2 मिमी पाऊस झाला असून, कमाल तापमान 32°C वर राहिले आहे. पुढील 24 तासांत हलक्याशा सरींची शक्यता आहे.
67
सांगली – ढगाळ वातावरण, हलका पाऊस
मंगळवारी सांगलीत 7 मिमी पाऊस नोंदविण्यात आला. पुढील 24 तासांत देखील ढगाळ वातावरण आणि हलक्याशा सरींची शक्यता आहे. कमाल तापमान 29°C, किमान 21°C राहील.
77
सांगली – ढगाळ वातावरण, हलका पाऊस
मंगळवारी सांगलीत 7 मिमी पाऊस नोंदविण्यात आला. पुढील 24 तासांत देखील ढगाळ वातावरण आणि हलक्याशा सरींची शक्यता आहे. कमाल तापमान 29°C, किमान 21°C राहील.