Maharashtra Rain Alert : कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज, विदर्भ-मराठवाड्याला येलो अलर्ट; वाचा तुमच्या येथील हवामान खात्याचा अंदाज

Published : Aug 31, 2025, 11:39 AM IST

पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी मध्यम ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच हवामान खात्याने विदर्भ-मराठवाड्यासाठी आज येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय कोकण आणि घाटमाथ्यावरही पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. 

PREV
15
राज्यात पावसाचा जोर आणि हवामानाचा अंदाज

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अधूनमधून हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. आज (31 ऑगस्ट) कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहणार असून ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

25
हवामान स्थिती

सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, कोटा, सेओनी, दुर्ग, भवानीपट्टनम, गोपालपूर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. याशिवाय उत्तर कोकण आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीमुळे गेल्या काही दिवसांत अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे.

35
तापमानातील चढउतार

शनिवारी (30 ऑगस्ट) सकाळपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आणि हवामानात उघडीप जाणवली. मात्र त्याचबरोबर तापमानात वाढ झाली. सकाळपर्यंतच्या 24 तासांत भंडारा येथे राज्यातील उच्चांकी 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर ब्रह्मपुरी येथे 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

45
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

येलो अलर्ट असलेले जिल्हे – पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, अमरावती, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया. उर्वरित जिल्हे – हवामानात उघडीप राहून ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरींचा अंदाज.

55
शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी

अचानक होणाऱ्या जोरदार सरींमुळे खरीप पिकांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात, मका, सोयाबीन, तूर यासारख्या पिकांभोवती योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी. पिकांमध्ये पाण्याचा ठिकठिकाणी साठा होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच भिजलेल्या हवामानामुळे रोग व कीड वाढण्याची शक्यता असल्याने त्यावर वेळेवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.

Read more Photos on

Recommended Stories