पुढील 24 तासांची हवामान स्थिती
सर्वाधिक प्रभावित होणारा भाग दक्षिण कोकण असणार आहे, जिथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, घाट भाग आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळासोबत पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, मुंबई शहर आणि उपनगरातही मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.