Maharashtra HSC Board Results 2024 : 12 वी बोर्डाचा निकाल या तारखेला लागण्याची शक्यता, येथे तपासून पाहता येईल रिजल्ट

Published : Apr 29, 2024, 11:33 AM ISTUpdated : Apr 29, 2024, 11:35 AM IST
punjab 10th results

सार

Maharashtra Board Results: महाराष्ट्रात लवकरच 12 वी बोर्डाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. अशातच निकाल कुठे पाहायचा आणि कसा तपासून पाहायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.....

Maharashtra HSC Board Results 2024 : महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2024 चे निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच बोर्डाच्या निकालासंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. यानुसार महाराष्ट्रात 12 वी बोर्डाचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. बोर्डाचा निकाल विद्यार्थ्यांना mahresult.nic.in  येथे तपासून पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आपला रोल नंबर, आईचे नावाचे पहिले अक्षर भरावे लागणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. संकेतस्थळाव्यतिरिक्त मोबाइल अ‍ॅप आणि एसएमएसच्या (SMS) माध्यमातूनही निकाल पाहता येणार आहे.

कधी झाली होती 12 वी बोर्डाची परीक्षा
महाराष्ट्रात 12 वी बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च, 2024 दरम्यान झाली होती. सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्या होत्या. या परीक्षेच्या निकालाकडेच आता सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (Maharashtra 12 vi boradacha nikal kadhi aahe?)

निकाल पाहण्यासाठी वेबसाइट्स

विद्यार्थअ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळासह पुढील काही वेबसाइट्सवरही निकाल पाहता येणार आहेत.

  • mahahsscboard.maharashtra.gov.in
  • mahresult.nic.in
  • result.gov.in
  • result.nic.in
  • hscresult.mkcl.org
  • mahahsc.in
  • mahahsscboard.in

बोर्डाचा निकाल असा तपासून पाहा

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल तपासून पाहण्यासाठी पुढील काही स्टेप्स लक्षात ठेवा.

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in येथे भेट द्या.
  • होमपेजवर Maharashtra HSC Results 2024 ची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  • लिंक सुरू केल्यानंतर बॉक्समध्ये रोल नंबर, आईचे नाव टाका.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर Submit पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला बारावी बोर्डाचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

आणखी वाचा :

12 वी नंतर नोकरीच्या शोधात आहात? या 7 कोर्सेसचा घ्या आधार

Lok Sabha Election 2024 : मतदान कार्ड हरवलेय? ऐन निवडणुकीवेळी असे करता येईल मतदान

PREV

Recommended Stories

Nagpur Smart City Case : स्मार्ट सिटी प्रकरणात तुकाराम मुंढेंना क्लीन चिट; ईओडब्ल्यू व पोलिसांचा अहवाल विधानसभेत सादर
BMC Elections 2025 : महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिंदे गट एकत्र लढणार; महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात