मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना बसणार उन्हाचा तडाखा, हवामान खात्याचा इशारा

Published : Apr 29, 2024, 09:19 AM ISTUpdated : Apr 29, 2024, 09:24 AM IST
Extreme heat in Bangladesh, weather change due to Cyclone Mocha know the reason

सार

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. मुंबई, ठाण्यातही उन्हाचा तडाखा बसत आहे. अशातच हवामान विभागाने उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेची लाट आणि वाढत्या उन्हामुळे मुंबईसह आसपासच्या ठिकाणचे नागरिक हैराण झाले आहेत. काही ठिकाणचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार गेले आहेत. हवामान खात्यानुसार, सोमवारी (29 एप्रिल) तापमान वाढलेलेच राहणार आहे. याशिवाय मुंबईकरांना आधीच उष्णतेची लाट येणार (Heat Wave) असल्याचा इशारा दिला होता.

मुंबईतील तापमानाची नोंद
हवामान खात्यानुसार रविवारी (28 एप्रिल) सर्वाधिक तापमान मुलुंड येथे 41.5 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद करण्यात आली होती. यानंतर गोरेगाव येथे 40.5 अंश सेल्सिअस, घाटकोपर येथे 40 डिग्री सेल्सिअसवर तापमान गेले होते. तर दक्षिण मुंबईतील तापमानाची 35 अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली.

ठाण्यातील तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पार
ठाणे येथील नागरिकही भीषण गरमीमुळे हैराण झाले आहेत. येथील तापमाची 42.4 डिग्री सेल्सिअस नोंद करण्यात आली. मीरा रोड येथे रविवारी तापमान 39.5 डिग्री सेल्सिअस होते. याशिवाय मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रांमधील तापमान 27.2 डिग्री सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना दिवसरात्र उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुढील दोन ते तीन दिवस तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअसमध्ये राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मुंबई, ठाण्यासह या जिल्हांना अ‍ॅलर्ट
हवामान खात्याने सोमवारसाठी (29 एप्रिल) उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रागयडसाठी अ‍ॅलर्ट जारी केला आहे.

गरज असेल तरच घराबाहेर पडा
वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे नागरिकांना गरज असेल तर घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. शरिरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय कडाक्याच्या उन्हात घराबाहेर पडताना डोक आणि चेहरा झाकण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा :

पुण्यातील कोचिंग सेंटरच्या 50 विद्यार्थ्यांना विषबाधा, रुग्णालयात दाखल; पोलिसांनी दिली ही मोठी अपडेट

Maharashtra : वसई-विरारमध्ये वाढत्या तापमानासह वीज कपात, पाणीही महागल्याने नागरिक संतप्त

PREV

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती