महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का! वरिष्ठ नेत्याने प्रचारसभेसाठी दिला नकार, खरगेंना पत्र लिहून सांगितले हे मोठे कारण

Lok Sabha Election 2024 : ऐन निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का बसला आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्याने काँग्रेसमधील प्रचार समितीच्या सदस्यत्वासह स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिली आहे. याशिवाय मल्लिकार्जुन खरगेंना एक पत्रही लिहिले आहे. 

Chanda Mandavkar | Published : Apr 27, 2024 4:52 AM IST / Updated: Apr 27 2024, 10:24 AM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. पण महाराष्ट्रात जागा वाटपाचा तिढा राजकीय पक्षांमध्ये कायम आहे. याच कारणास्तव काही नेत्यांनी निवडणूक प्रचारामधून माघारही घेतली आहे. अशातच आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते आरिफ नसीम खान (Nassem Khan) यांनी प्रचार समितीच्या सदस्यत्वासह स्टार प्रचारक (Star Campaigners) पदाचा राजीनामा दिला आहे. खरंतर, महाराष्ट्रातील एकाही जागेवर मुस्लीम उमेदवार न उतरवल्याने नसीम खान नाराज होते. याशिवाय पक्षातून पदाचा राजीनामा का देत आहे याचे कारणही नसीम खान यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना सांगितले आहे.

नसीम खान यांनी पत्रात असे म्हटले आहे की, राज्यात 48 लोकसभेच्या जागा आहेत. यापैकी एकाही जागेवर पक्षाने मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. याशिवाय काँग्रेसला मुस्लीम उमेदवार आहेत, पण उमेदवार का नको? असा सवालही उपस्थितीत केला आहे.

नसीम खान यांना निवडणूक लढवायची होती
सूत्रांनुसार, नसीम खान यांना मुंबई उत्तर मध्य जागेवरून निवडणूक लढवायची होती. पण पक्षाने नसीम खान यांचे तिकीट कापत वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी दिली. यामुळेच नसीम खान नाराज होते. वर्ष 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईतील चांदीवली येथून 409 मतांनी नसीम खान यांचा पराभव झाला होता. आता स्टार प्रचारक नसीम खान यांनी अशी घोषणा केलीय की, लोकसभेसाठी पक्षातील कोणत्याही उमेदवारासाठी प्रचार करणार नाहीत.

नसीम खान यांनी नक्की काय म्हटले?
महाविकास आघाडीने महाराष्ट्रात लोकसभेच्या एकाही जागेवरून मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिलेले नाही. खरंतर, संपूर्ण महाराष्ट्रात काही मुस्लीम संघटना, नेता आणि उमेदवार अशी अपेक्षा करत होते की, काँग्रेस अल्पसंख्यांक समुदायातील कमीत कमी एका उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल. पण पक्षाने तिकीट कापले.

नसीम खान यांनी पुढे म्हटले की, ज्यावेळी पक्षाने मला गुजरात, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि अन्य राज्यातील निवडणुकीची जबाबादारी दिली असता ती पूर्ण प्रयत्नाने पार पाडली आहे.

आणखी वाचा : 

500 रुपयांत गॅस सिलेंडर, शासकीय नोकरीत महिलांना आरक्षण....शरद पवारांच्या जाहीरनाम्यात करण्यात आल्यात या मोठ्या घोषणा

शिखर बँकेच्या कथित 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट

Read more Articles on
Share this article