Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रात NDA मधील पक्षांमध्ये सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरला, जाणून घ्या कोणत्या चेहऱ्यांना मिळणार संधी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एनडीए आघाडीमध्ये सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरला आहे. जाणून घ्या कोणत्या पक्षाने कोणत्या चेहऱ्यांना दिली संधी यासंबंधित सविस्तर....

Chanda Mandavkar | Published : Mar 13, 2024 6:20 AM IST / Updated: Mar 13 2024, 11:54 AM IST

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एनडीए आघाडीमध्ये सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरला आहे. महाराष्ट्रात एनडीए आघाडीमध्ये (NDA) एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) समावेश आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या वाट्याला चार जागा आल्या आहेत. अजित पवार बारामती, रायगड, शिरूर आणि परभणी येथून आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. याशिवाय भाजप 31 जागांवर आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेकडून 13 जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे.

बारामतीत पवार विरूद्ध पवार लढत होणार
गेल्या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने दिला होता. यामुळे शरद पवार यांनी आपल्या पक्षाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' असे नाव दिले आहे. अशातच गेली अनेक वर्ष बारामती पवार परिवाराचा गड राहिला आहे. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती येथून अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी चुरस रंगणार आहे.

सध्या बारामती येथून सुप्रिया सुळे खासदार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहण्याची शक्यता आहे. याशिवाय अजित पवारांकडून खासदार सुनील तटकरे यांना अनंत गीते यांच्या विरोधात रायगड येथून उतरवण्याची शक्यता आहे. अशी अपेक्षा आहे की, अनंत गीते यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून रायगड येथील जागेवरुन निवडणुकीसाठी तिकिट दिले जाऊ शकते. गीते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात केंद्रीय मंत्रीपद सांभाळले होते.

शिरूर येथून या चेहऱ्यांना मिळू शकते संधी
शिरूर येथून अजित पवार प्रदीप कांड किंवा अढळराव पाटील यांना तिकिट देऊ शकतात. दोघेही नेते पक्षाचा भाग नाहीत. शिवसेनेचे माजी खासदार पाटील यांची गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडा (MHADA) च्या प्रमुख रुपात नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय प्रदीप कांड हे पुण्यातील एका जिल्हा सहकारी बँकेचे प्रमुख आहेत.

परभणी येथील जागेवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संजय हरिभाऊ जाधव खासदार आहेत. अशी अपेक्षा आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस जाधव यांच्या विरोधात राजेश विटेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. विटेकर हे परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत.

आणखी वाचा : 

Maharashtra : शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक असणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्राला वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचे मानले आभार, म्हणाले....

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाशिममध्ये अनावरण (See Photos)

Read more Articles on
Share this article