Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा दौंड ते यवतपर्यंत लोकल ट्रेनने प्रवास, जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच बारामतीच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांनी पुणे लोकलने प्रवास केला.

Chanda Mandavkar | Published : Mar 20, 2024 6:08 AM IST / Updated: Mar 20 2024, 11:42 AM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. राज्यात पाच टप्प्यात मदतान होणार आहे. अशातच राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीसह प्रचारही सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यात (Pune) लोकल ट्रेनने प्रवास केला. या प्रवासावेळी लोकलमधील प्रवाशांसोबतही संवाद साधला.

सुप्रिया सुळेंचा लोकलने प्रवास
बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात दौंड डेमू लोकलने (Pune Daund Demu Local) यवत ते दौंडपर्यंतचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान, सुप्रिया सुळे यांनी लोकलमधील प्रवाशांसोबत संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. याशिवाय आजवर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कामाची माहितीही प्रवाशांना दिली. मतदारांच्या सातत्याने सुप्रिया सुळे गेल्या काही दिवसांपासून भेट घेत आहेत. याआधी सुप्रिया सुळे बारामती येथील बॅडमिंटच्या खेळात सहभागी झाल्या होत्या.

बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध सुप्रिया सुळे
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती (Baramati) येथून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना बारामती येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

शरद पवारांचे मतदारांना सुप्रिया सुळेंना मत देण्याचे आवाहन
शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पक्षातून सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभेच्या जागेवरुन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. शरद पवारांनी मतदारांना आमच्या पक्षाचे नवे चिन्ह 'तुतारी' (Tutari) यावर मतदान करत सुप्रिया सुळेंना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

अजित पवारांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस
जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांसह अजित पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. या राजकरणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या गटाने सभापतींना पक्ष तोडणाऱ्या आमदारांना अयोग्य घोषित करण्याची मागणी केली होती. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अयोग्येसंदर्भात 15 फेब्रुवारीला निर्णय देत अजित पवारांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय दिला होता. यामुळे शरद पवारांकडून घड्याळ आणि पक्षाचे नावही गेले.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या घोषणेआधी काँग्रेसचा मोठा निर्णय, सांगली येथून विशाल पाटील यांना उतरवण्याचा निर्णय

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती

मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनाबाहेरील पाटी बदलली, 'एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे' लावले नाव (VIDEO)

Read more Articles on
Share this article