म्हाडाच्या पुणे महामंडळाने पंतप्रधान आवास योजनेतील न विकल्या गेलेल्या घरांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, सांगली आणि सोलापूरमधील ही घरे आता सोडतीशिवाय, 'आधी अर्ज करणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर विकली जाणार आहेत.
म्हाडाची घरे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असतात. म्हाडाच्या पुणे महामंडळाच्या पंतप्रधान आवास योजनेतील पुणे, सांगली आणि सोलापूरमधील घरे दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा सोडत होऊनही विकली गेली नाहीत.
26
पुणे महामंडळाने घरे विकण्याचा घेतला निर्णय
या घरांची विक्री करण्यासाठी पुणे महामंडळाने निर्णय घेतला आहे. यासाठीची शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता ज्यांना घरे घ्यायची आहेत त्यांनी आधी अर्ज करून घर खरेदी करता येणार आहे.
36
घरांच्या किंमती किती आहे?
घरांच्या किंमती या ७ लाखांपासून ते १५ लाखांपर्यंत असणार आहे. अर्जदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे म्हाडाची काही घरे रिक्त राहिली आहेत. महागड्या घरांमुळे या घरांच्या विक्री करता होत नाही, त्यामुळे त्यांची प्राधान्याने विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे महामंडळातील म्हाळुंगे, शिरूर, चाकण, सोलापूरमधील करमाळा आणि सांगलीतील मिरज येथील घरांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इच्छुक व्यक्तींना म्हाडाच्या साईटवर जाऊन घर खरेदी अर्ज भरता येणार आहे.
56
कार्यालयीन वेळेत अर्ज भरता येणार
कार्यालयीन वेळेत अर्जदारांना अर्ज भारत येणार आहे. सोडतीविना या घरांचे वितरण केले जाणार असले तरी यासाठी सोडतीतील पात्रतेच्या अटी लागू होणार आहेत.
66
अर्जदारांसाठी अटी काय आहेत?
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखांपेक्षा कमी असायला हवं. घरांच्या वितरणासाठी आरक्षण लागणार आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जनता या प्रवर्गाद्वारे घरांची विक्री केली जाणार आहे.