Maharashtra Weather Alert: शुक्रवारपासून महाराष्ट्रात दुहेरी हवामान संकटाचा इशारा देण्यात आला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात हवामान कोरडे राहील
मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानाचं चक्र फिरत आहे. भारतीय हवामान विभागानं शुक्रवार, 17 ऑक्टोबरसाठी राज्यात दुहेरी हवामान संकटाचा इशारा दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर विदर्भात कोरडे वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे.
28
हवामानात बदल, उकाडाही वाढणार!
सध्या राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून, अनेक भागांमध्ये तापमानात किंचित वाढ दिसून येत आहे. हवामान खात्यानुसार उकाड्याची तीव्रताही थोडी वाढण्याची शक्यता आहे.
38
कोकण व मुंबई परिसर
मुंबईसह कोकणात ढगांच्या गडगडाटासह हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे.
मुंबईचे तापमान: कमाल – 36°C | किमान – 26°C
पावसाचा प्रभाव असणारे जिल्हे: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
नागरिकांनी हवामान बदलांकडे लक्ष ठेवून घ्यावी खबरदारी
राज्यात काही भागांत पावसाचे सत्र पुढे चालू राहण्याची शक्यता असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वीजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामान बदलांकडे लक्ष ठेवून योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.