Former President Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

Published : Mar 14, 2024, 11:40 AM ISTUpdated : Mar 14, 2024, 12:48 PM IST
Former President Pratibha Patil

सार

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना बुधवारी (13 मार्च) पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना छातीत इन्फेक्शन आणि ताप आल्याचे सांगितले जात आहे.

Former President Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना ताप आणि छातीत इन्फेक्शनच्या कारणास्तव पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या प्रतिभा पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 89 वर्षीय प्रतिभा पाटील यांना बुधवारी (13 मार्च) रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती देत म्हटले की, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप आणि छातीत इन्फेक्शनच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. प्रतिभा पाटील सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

प्रतिभा पाटील यांनी वर्ष 2007 ते वर्ष 2012 पर्यंतच्या कालावधीत 12 व्या राष्ट्रपतींच्या रुपात कार्य केले होते. त्या देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती आहेत.

आणखी वाचा : 

Mumbai Railway Stations Name : मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांना मिळणार ही नवी नावे, महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

परिवहन विभागाच्या 187 इंटरसेप्टर वाहनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्राला वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचे मानले आभार, म्हणाले.…

PREV

Recommended Stories

अपघाताची बातमी वाचून डोळ्यापुढं येतील अंधाऱ्या, गोंदियातील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; ४० पेक्षा जास्त प्रवासी जखमी
Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ