Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : गडकोट-किल्ले हा आपला ठेवा, तो जपण्याचे काम करू - CM एकनाथ शिंदे

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' (Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai) अशा जयघोषात किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' (Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai) अशा जयघोषात मंगळवारी (19 फेब्रुवारी) किल्ले शिवनेरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024) जल्लोषात साजरा करण्यात आला.

“छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध 20 पर्यटन स्थळे विकसित होत आहेत. यामध्ये किल्ले रायगडाप्रमाणेच (Raigad Fort) शिवनेरीचाही (Shivneri) विकास करण्यात येईल”, असे यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची कल्पना सामान्य माणूस करू शकत नाही, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली.

प्रजेपुढे स्वतःचे दुःख कवडीमोल मानले - मुख्यमंत्री शिंदे

अखंड हिंदुस्थानचे अभिमान, दैवत आणि लोकशाहीचा कारभार साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024) यांच्या कारकिर्दीत झाला. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. 

अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले. प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते. शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024) साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असेही यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर (Junnar) हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी (Leopard Safari) विकसित करण्याचे घोषित केले आहे. येथील सुकाळवेढे, बोरघर, डुचकेवाडी, खेतेपठार मार्गे शिवजन्मभूमी आणि भीमाशंकर (Bhimashankar) ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

किल्ल्यांच्या विकासासाठी ASIचे नियम शिथिल करण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक - DCM देवेंद्र फडणवीस

“राज्यातील किल्ल्याचे संवर्धन करत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (ASI) येणाऱ्या अडचणीबाबत केंद्र शासन (Central Government) स्तरावर पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धती सोपी करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. पद्धत सोपी झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल. छत्रपती शिवाजी महाराज (. Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे किल्ले म्हणून जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे”, अशी माहिती उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या कार्याचा इतिहास आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा, यासाठी राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. किल्ले शिवनेरी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 83 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. किल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिली.

आणखी वाचा

Chhatrapati Shivaji Maharaj : लंडनमधील आर्टीफिशिअल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणार - मायकल मिलेनी

PM Modi Jammu Visit : PM मोदींचा 20 फेब्रुवारीला जम्मू दौरा; 30,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन

Share this article