महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. भूस्खलनासह झाडे कोसळण्याच्याही घटना समोर येत आहेत. तर आजच्या ताज्या अपडेट्स एशियानेट न्यूज मराठीवर पाहा…

10:46 PM (IST) Jul 06
Heavy Rain in Thane school Closed : ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजला उद्या ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
09:43 PM (IST) Jul 06
Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वरमध्ये नदीवरील एक पूल खचल्याची घटना समोर आली आहे. पूल खचल्यानंतर तिथे अडकलेल्या पर्यटकांना आणि वाहनांना क्रेनच्या मदतीने सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं.
07:33 PM (IST) Jul 06
Mumbai Rain Work From Home : राज्यभरात मुसळधार पावसाने अनेक भाग जलमय झाले आहेत. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन केलं आहे.
06:12 PM (IST) Jul 06
Pune Rain Ashadi Wari Alandi : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. अशात आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे.
04:54 PM (IST) Jul 06
Nashik Cloudburst News : नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अंदाजानंतर शहरात शाळा-कॉलेजला सुट्टी देण्यात आली. तर सप्तश्रृंगी आणि त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
03:04 PM (IST) Jul 06
मुंबई-पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका विमान सेवेलाही झाला आहे. यामुळे इंडिगो कंपनीकडून विमानाने प्रवास करण्यापूर्वी वेबसाइटवर वेळापत्रक पाहा असे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.
02:14 PM (IST) Jul 06
राज्यात ठिकठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच येत्या 8 जुलैपर्यंत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. याशिवाय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
01:34 PM (IST) Jul 06
मुंबई-गोवा महामार्गावर 8 ठिकणी दरड कोसळल्याची दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहे.
12:48 PM (IST) Jul 06
मुंबईकडे जाणारा एक्स्प्रेसवे बंद झाला आहे. याशिवाय दरड कोसळली गेली आहे. घटनास्थळी दरड बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे. याशिवाय मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
12:40 PM (IST) Jul 06
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन विभागात आढावा घेण्यात आला आहे.
12:33 PM (IST) Jul 06
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
11:19 AM (IST) Jul 06
मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
10:44 AM (IST) Jul 06
दादरच्या सानेगुरूजी विद्यालयाजवळ झाडं कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे एका वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय मरिन ड्राइव्हवरील देखील झाडं कोसळल्याची घटना घडली आहे.
10:23 AM (IST) Jul 06
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.
10:15 AM (IST) Jul 06
मुंबई-गोवा महामार्गावर 5 तास वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या पाण्यातून वाहने काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
10:01 AM (IST) Jul 06
उरसे टोलनाका परिसात दरड कोसळली गेली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे.
10:00 AM (IST) Jul 06
मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याच्या प्रकारावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट केले आहे.
पहिल्याच पावसात Infra Man चा Disaster Man झाला आहे!
दोन खड्ड्यांना "पहिल्या पावसाचं टेस्टिंग" म्हणणारे मुख्यमंत्री, आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या हजारो कोटींच्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पावर दरड कोसळून रस्ता बंद झाल्यालाही "मान्सून ट्रायल" म्हणणार का?
जगभर डोंगर फोडून बोगदे उभे… pic.twitter.com/sBgjbdlQ9v— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) July 6, 2026
08:56 AM (IST) Jul 06
मावळ तालुक्यातील पाटण येथील एका दुर्गम गावात दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. एका घरावर दरड कोसळून संपूर्ण कुटुंब त्या खाली अडकल्याची भीती आहे. घटनास्थळी बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.
08:45 AM (IST) Jul 06
मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी दरड बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे मुंबई-पुणे अशा दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांनी पुढील सुचनेपर्यंत या मार्गावर प्रवास करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.