Valentine Day Week List 2024 : फेब्रुवारी महिन्यात या दिवसापासून सुरू होणार 'व्हॅलेंनटाइन वीक', पाहा 'रोझ डे ते किस डे' पर्यंतचे कॅलेण्डर

Valentine Day 2024 : फेब्रुवारी महिना कपल्ससाठी अत्यंत खास असतो. येत्या 14 फेब्रुवारीला मोठ्या आनंदात, उत्साहात ‘व्हॅलेंनटाइन डे’ साजरा केला जातो. पण 'व्हॅलेंनटाइन डे' च्या एक आठवडा आधी 'व्हॅलेंनटाइन वीक' सुरू होतो. 

Chanda Mandavkar | Published : Feb 1, 2024 10:36 AM IST / Updated: Feb 01 2024, 04:11 PM IST

Valentines Day 2024 Week List : फेब्रुवारी महिन्याची आजपासून सुरूवात झाली आहे. कपल्सकडून फेब्रुवारी महिन्याची आवर्जून वाट पाहिली जाते. या महिन्याला 'प्रेमाचा महिना' म्हटले जाते. प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा केला जातो. पण त्याआधी 'व्हॅलेंनटाइन वीक' सुरू होतो. 'व्हॅलेंनटाइन डे वीक' मध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळा डे साजरा केला जातो. जाणून घेऊया 'व्हॅलेंनटाइन वीक' मध्ये कोणता डे किती तारखेला साजरा केला जाणार याबद्दल अधिक....

व्हॅलेंनटाइन डे वीक कॅलेण्डर

14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंनटाइन डे’ का साजरा केला जातो?
व्हॅलेंनटाइन डे’ ची सुरुवात रोममधील राजा क्लॉडियसच्या (Roman Emperor Claudius) काळापासून झाली होती. राजा क्लॉडियसला वाटायचे प्रेम आणि लग्नामुळे पुरुषांची ताकद कमी होते. याच विचाराने क्लॉडियसने आपल्या राज्यात असा आदेश जारी केला की, राज्यातील अधिकारी आणि सैनिक लग्न करू शकत नाहीत. पण, याउलट सेंट व्हॅलेंनटाइन नेहमीच प्रेमाला प्रोत्साहन देण्याबद्दल बोलायचे. 

सेंट व्हॅलेंनटाइन यांना राजाच्या आदेशाबद्दल कळले असता त्यांनी त्याचा विरोध केला. सेंट व्हॅलेंनटाइन यांनी काही अधिकारी आणि सैनिकांचे लग्न लावून दिले. राजा क्लॉडियसला जेव्हा सेंट व्हॅलेंनटाइन यांनी केलेल्या कृत्याबद्दल कळले असता त्यांना 14 फेब्रुवारी 269 च्या दिवशी फाशीची शिक्षा दिली. सेंट व्हॅलेंनटाइन यांच्या निधनानंतर नागरिकांनी त्यांनी दिलेल्या बलिदानाचा सन्मान केला. यामुळेच सेंट व्हॅलेंनटाइन यांच्या आठवणीत 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला.

पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला ‘व्हॅलेंनटाइन डे’?
'व्हॅलेंनटाइन डे' साजरा करण्याची सुरुवात रोमन फेस्टिव्हल पासून झाली. जगभरात पहिल्यांदा 496 मध्ये 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा करण्यात आला. त्यानंतर पाचव्या शतकात रोमचे पोप गेलासियस (Pope Gelasius) यांनी 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून रोमसह संपूर्ण जगभरात प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा केला जाऊ लागला.

आणखी वाचा : 

कॅक्टसच्या या उपायांनी दूर होतील आयुष्यातील समस्या

Valentine Day पर्यंत कंबर होईल बारीक, या 4 मसाल्यांचा करा वापर

अनुष्का शंकरचे हे इंडो-वेस्टर्न ड्रेस प्रत्येक फंक्शनसाठी आहेत परफेक्ट

Share this article