तुम्ही चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपी घरी तयार केल्या असतील. बहुतांशजणांना तंदुरमधील चिकनच्या रेसिपी आवडतात. अशातच वीकेंड पार्टीसाठी अचारी टिक्का रेसिपी बेस्ट पर्याय आहे.
Achari Chicken Tikka : विकेंड पार्टीला घरी मित्रपरिवार येणार असल्यास तुम्ही नॉन-व्हेजचा बेत हमखास ठेवता. अशातच वीकेंड पार्टीसाठी तुम्ही अचारी चिकन टिक्काची रेसिपी नक्की तयार करू शकता. जाणून घेऊया यासाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर.....
सामग्री
500 ग्रॅम बोनलेस चिकन
2 चमचे दही
लिंबाचा रस
2 चमचे अचारी मसाला
1 चमचा आल-लसूण पेस्ट
1 चमचा लाल तिखट
1/2 चमचा हळद
मीठ चवीनुसार
2 मोठे चमचे तेल
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात दही, लिंबाचा रस, अचारी मसाला, आल-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ आणि तेल मिक्स करून मॅरिनेशन पेस्ट तयार करा.
मॅरिनेशच्या पेस्टमध्ये चिकनचे बारीक तुकडे मिक्स करून दोन तास किंवा रात्रभर फ्रिजमध्ये व्यवस्थितीत मॅरिनेट होण्यासाठी ठेवा.
ओव्हन 200 डिग्री सेल्सिअसवर गरम करा आणि बेकिंग ट्रे वर अॅल्युमिनिअम फॉइल पसरवा. मॅरिनेट केलेले चिकन ट्रे मध्ये ठेवा. यावेळी मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे एकमेकांना चिकटले जाणार नाही याची काळजी घ्या.
चिकन ओव्हनमध्ये 15-20 मिनिटांसाठी बेक करा. चिकन बेक करताना व्यवस्थितीत भाजले जातेय ना याकडे लक्ष द्या.
चिकन भाजल्यानंतर ओव्हनमधून काढत एका प्लेटमध्ये ठेवा. आता चिकनवर बटर लावा.
अशाप्रकारे तयार होईल तुमची अचारी टिक्काची रेसिपी. पार्टीसाठी आलेल्या मित्रपरिवाराला अचारी टिक्कासोबत लिंबू, कांदा आणि हिरवी चटणी सर्व्ह करून खाण्यासाठी द्या.
VIDEO : अचारी चिकन टिक्की रेसिपीचा संपूर्ण व्हिडीओ पाहा शेवटपर्यंत…..