Talcum Powder Linked With Cancer : डब्लूएचओकडून नुकताच टाल्क संदर्भात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. डब्लूएचओने म्हटले की, टाल्कमुळे व्यक्तीला कर्करोगासारखा गंभीर आजार होऊ शकतो.
Talcum Powder Linked With Cancer : डब्लूएचओच्या (WHO) कॅन्सर एजेंसीने शुक्रवारी (5 जुलै) एक मोठा खुलासा करत म्हटले की, टॅल्कम पावडरमुळे व्यक्तीला कर्करोगासारखा गंभीर आजार होऊ शकतो. रिसर्च केल्याच्या काही आठवड्यानंतर असे समोर आले की, टॅल्कम पावडर आणि गर्भाशयाचा कर्करोग (Ovarian Cancer) यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे.
याआधी डब्लूएचओच्या कॅन्सरवर रिसर्च करणाऱ्या आंतरराष्ट्रीय एजेंसीने (IARC) म्हटले होते की, टॅल्कम पावडरमुळे व्यक्तीला गर्भाशयाचा कॅन्सर होतो याबद्दलचा निर्णय मर्यादित पुराव्यांच्या आधारावर घेण्यात आला होता. पण उंदारांवर करण्यात आलेल्या रिसर्चनंतर पुरेसे पुरावे हातात आल्यानंतर टॅल्कम पावडरमुळे व्यक्तीमध्ये कर्करोगाची शक्यता निर्माण होते असे समोर आले.
टॅल्कम पावडरचा वापर केल्याने महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका
कॅन्सर एजेंसीने म्हटले अनेक अभ्यासातून समोर आले आहे की, बहुतांश महिला प्रायव्हेट पार्टसाठी टॅल्कम पावडरचा वापर करतात. यामुळेच महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरची वाढ होते. दरम्यान, द लॅसेंट ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार, टॅक्लसाठी एक कारणात्मक भूमिका पूर्णपणे स्थापित केली जाऊ शकत नाही.
तथ्ये की दिशाभूल करणारे दावे?
-IARC ने म्हटले की, बहुतांशजण टॅल्कम पावडर बेबी पावडर अथवा कॉस्मेटिकच्या रुपात वापरतात. पण टॅल्कबद्दल अधिक जाणून घेतल्यास कळते की, त्याचे उत्खनन केल्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते. अथवा प्रोडक्ट्स म्हणून वापरण्यासाठी तयार केले जाते.
-टॅल्क हे नैसर्गिकरित्या आढळणारे खनिज असून ज्याचे जगभरात उत्खनन केले जाते. याचा वारंवार वापर टॅल्कम बेबी पावडर तयार करण्यासाठी केला जातो.
-AFP वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, युके ओपन युनिव्हर्सिटीतील सांख्यिकीशास्रज्ञ केविन कॅककॉनवे यांनी म्हटले की, IARC ने केलेल्या रिसर्चमध्ये आमचा सहभाग नव्हता. याशिवाय कॅककॉनवे यांनी म्हटले की, IARC ने स्पष्टपणे केलेले दावे दिशाभूल करणारे असू शकतात.कॅककॉनवे यांनी पुढे म्हटले की, अभ्यास निरिक्षणात्मक असल्याने टॅल्कमच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका वाढला जातो हे सिद्ध झालेले नाही.
टॅल्कम पावडरचा वापर करणाऱ्या महिलांवर असा होतो परिणाम
15 मे रोजी जाहिर करण्यात आलेल्या जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीच्या रिसर्चनुसार, टॅल्कम पावडरचा प्रायव्हेट पार्टवर वापर केल्यास गर्भाशयाचा कॅन्सर होत असल्याची लिंक समोर आली. यामुळेच महिलांमध्ये अंडाशय निर्माण करणाऱ्या हिस्याला नुकसान पोहोचले जाते. खरंतर, दीर्घकाळापासून प्रायव्हेट पार्टसाठी वापरणाऱ्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका अधिक वाढला जातो.
दरम्यान, गर्भाशयाचा कॅन्सर जोवर पोट अथवा पेल्विकपर्यंत पोहोचत नाही तोवर त्याचे निदान करणे शक्य होत नाही. या स्तरावर गर्भाशयाच्या कॅन्सरवर उपचार करणे अधिक कठीण अथवा घातक ठरू शकते.
आणखी वाचा :
मान्सूनमध्ये करा या 7 फळांचे सेवन, Immunity होईल बूस्ट
पावसाळ्यात उगवणाऱ्या 10 रानभाज्या, निरोगी आरोग्यासाठी ठरतील वरदान