Lifestyle

मान्सूनमध्ये करा या 7 फळांचे सेवन, Immunity होईल बूस्ट

Image credits: Getty

मान्सूमध्ये कोणत्या फळांचे सेवन करावे?

मान्सूनमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतील अशा पद्धतीचे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. मान्सूनमध्ये कोणत्या फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल हे पाहूया…

Image credits: Getty

चेरी

मान्सूनमध्ये मिळणाऱ्या चेरीचे सेवन केल्याने संक्रमित आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. याशिवाय सूजेची समस्याही कमी होऊ शकते.

Image credits: Getty

सफरचंद

सफरचंदमध्ये व्हिटॅमिन ए, बी1, बी2 सह सी असे गुणधर्म असतात. मान्सूनमध्ये सफरचंदाचे सेवन केल्याने आरोग्य हेल्दी राहण्यास मदत होते.

Image credits: Pixabay

पेर

व्हिटॅमिन सी ने समृद्ध असणाऱ्या पेरचे मान्सूनमध्ये सेवन करु शकता. पेरमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Image credits: Pixabay

आलू बुखारा

रसाळदार फळ असणारे आलू बुखारा मान्सूमध्ये खाल्ल्याने आरोग्यसाठी फायदेशीर ठरु शकते. यामध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन असे गुणधर्म असल्याने इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होईल.

Image credits: instagram

लिची

लिचीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. याच्या सेवनाने अपचन, अ‍ॅसिडीटीची समस्या दूर होते. याशिवाय मान्सूनमध्ये सर्दी-खोकल्याच्या आजारापासून दूर राहता.

Image credits: Getty

जांभूळ

जांभूळ प्रत्येक सीझनमध्ये खाणे आरोग्यसाठी आरोग्यदायी ठरु शकते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढली जाते. याशिवाय बद्धकोष्ठतेसंदर्भातील समस्या दूर होतात.

Image credits: Pinterest

डाळिंब

डाळिंबामध्ये आवश्यक पोषण तत्वे आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात. यामुळे गंभीर आजारांपासून दूर राहता. डाळिंबाच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासह ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधार होते.

Image credits: Getty