Lifestyle

पावसाळ्यात उगवणाऱ्या 10 रानभाज्या, निरोगी आरोग्यासाठी ठरतील वरदान

Image credits: Facebook

भारंग

भारंगची भाजी कोवळी असताना तोडली जाते. या भाजीचे कोंब आणि पाने भाजीसाठी वापरली जातात. भारंग भाजीच्या पानांमध्ये लोहाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते.

Image credits: Facebook

टाकळा

पावसाळ्यात खासकरुन तयार केली जाणारी टाकळ्याची भाजी सर्व प्रकारच्या त्वचारोगासाठी औषधीय गुणधर्मांसाठी ओखळली जाते. टाकळ्याची भाजी खाल्ल्याने शरिरातील वात, कफदोष कमी होण्यास मदत होते.

Image credits: Facebook

कपाळफोडी

कपाळफोडी वेलीवर येणारी वनस्पती आहे. संधीवात असणाऱ्या रुग्णांसाठी कपाळफोडी भाजी अत्यंत गुणकारी असल्याचे सांगितले जाते. पोट गच्च होणे, नियमित मासिक पाळी येण्यासाठीही मदत करते.

Image credits: Facebook

शेवळा

शेवळा कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील जंगलांमध्ये आढळते. शेवळा म्हणजे सुरणाच्या फुलाची दांडी. याच्या भाजीत भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आढळतात.

Image credits: Facebook

कुलुची भाजी

मान्सूनमध्ये जंगलात आढळणारी कुलुची भाजीला फोडशी अथवा काल्ला नावानेही ओखळले जाते. कुलुची भाजी गवतासारखी दिसते.

Image credits: Facebook

कुरडूची भाजी

कुरडूची कोवळी पाने शिजवून त्याची भाजी केली जाते. कफविकार, जुना खोकला यासाठी कुरडूची भाजी गुणकारी ठरते. याशिवाय लघवी स्वच्छ होण्यासाठीही कुरडूची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Image credits: Facebook

दिंडा भाजी

पावसाळ्यातच मिळणारी दिंडा भाजीची मिळते. याची पूर्ण वाढ होण्याआधीच भाजीचे कोंब काढले जातात. पावसाळा संपल्यानंतर दिंडा भाजी मृत अवस्थेत जाते.

Image credits: Facebook

कर्टोली

कर्टोली फळभाजी असून पावसाळ्यातच उगवली जाते. कडू लागणारी कर्टोली डोकेदुखीवर फायदेशीर ठरते. मधुमेहाच्या रुग्णांनी कर्टोलीचे सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते.

Image credits: Facebook

मायाळू भाजी

मायाळू भाजी अंगणात अथवा घरातील कुंडीमध्ये देखील लावता येते. पित्ताशयाच्या समस्येसह पचनास हलकी आणि सांधेदुखीसाठी मायाळू भाजी गुणकारी ठरते.

Image credits: Facebook

आघाडा

आघाडा भाजीत अ जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आहेत. शरिरातील हाडांच्या बळकडीसाठी आघाड्याची भाजी खाल्ली जाते. याशिवाय मुतखडा, मूळव्याध आणि पोटदुखीवरही भाजी फायदेशीर ठरते.

Image credits: Facebook