Breast Cancer : गेल्या काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची बातमी समोर आली होती. याची खुद्द माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली होती.
Hina Khan Breast Cancer : अभिनेत्री हिना खानने गेल्या काही दिवसांपूर्वी तिला तिसऱ्या स्टेजमधील ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती होती होती. यामुळे हिना खानच्या चाहत्यांसह सर्वांनी तिच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. हिना खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, मला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. यावर सध्या उपचार सुरु आहेत. काही समस्यांचा सामना करत असली तरीही मी ठिक आहे. या आजारावर लढण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. मला मजबूत बनवण्यासाठी कोणतीही गोष्ट सध्याच्या घडीला करण्यासाठी मी तयार आहे.
पुढे हिना खानने म्हटले होते की, तुमचे प्रेम आणि सन्मानाची कदर आहे. पण सध्या आमच्या प्रायव्हसीची काळजी घेतली जाईल. मला आणि माझ्या परिवाराला पूर्णपणे विश्वास आहे की, कॅन्सर विरोधातील मी लढाई जिंकेन.
WHO चा रिपोर्ट काय म्हणतो?
डब्लूएचओच्या रिपोर्ट्सनुसार, भारतातील महिलांचा मृत्यू होण्यामागील सर्वाधिक मोठे कारण ब्रेस्ट कॅन्सर आहे. ब्रेस्ट कॅन्सरमुळे प्रत्येक वर्षी सर्वाधिक मोठ्या संख्येने महिलांचा मृत्यू होतो. यामध्ये लहान आणि वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांचा देखील समावेश आहे. यामधील सर्वाधिक मोठी बाब अशी, ब्रेस्ट कॅन्सरचे निदान दुसऱ्या स्टेजमध्ये होते.
ब्रेस्ट कॅन्सरबद्दल वेळीच कळल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे. अशातच हिना खानला झालेल्या तिसऱ्या स्टेजमधील ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार शक्य आहे की नाही याची चिंता चाहत्यांना सतावत आहे.
आरोग्य तज्ज्ञांचे मत
कॅन्सर एक्सपर्ट्स यांच्या मते, ब्रेस्ट कॅन्सरच्या चार स्टेज असतात. प्रत्येक स्टेजमध्ये पुढे जाताना रुग्णाची प्रकृती खालावली जाते. डॉक्टर्सच्या मते पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये उपचार करणे सोपे असते. पण तिसऱ्या स्टेजमध्ये उपचार करताना काही समस्या येतात. कारण तिसऱ्या स्टेजमध्ये कॅन्सर संपूर्ण शरिरात फैलावला जात असतो. चिंतेची बाब अशी की, या स्टेजवर कॅन्सर पोहोचल्यानंतर पुन्हा होण्याचा धोकाही वाढला जातो. दरम्यान, डॉक्टरांच्या मते स्टेज-3 ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार करणे शक्य आहे. स्टेज-3 ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारासाठी सर्वसामान्यपणे कीमो थेरेपी, सर्जरी, रेडिएशन थेरेपी केली जाते.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे काय?
हिना खानला झालेल्या ब्रेस्ट कॅन्सरनंतर आता असे प्रश्न उपस्थितीत होतायत की, याचे निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या केल्या पाहिजेत. आजाराचे निदान करण्यासाठी तुम्ही स्तन परिक्षण, मॅमोग्राम, स्तन अल्ट्रासाउंड स्कॅन, स्तन बायोप्सीसारख्या चाचण्या करु शकता.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
चेहऱ्यावरील नकोसे केस या 4 सोप्या उपायांनी काढा, वेदनाही होणार नाही