July Vrat Tyohar 2024 : जुलै महिन्याला सुरुवात झाली असून प्रत्येक महिन्याप्रमाणे या देखील महिन्यात काही सणवार साजरे होणार आहेत. याशिवाय याच महिन्यात तीन एकादशींचा शुभ योग देखील आला आहे.
July Festival Calendar 2024 : यंदाच्या वर्षातील जुलै महिना व्रत-सणवारांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे. जुलै महिन्यापासूनच भगवान विष्णू चार महिन्यांसाठी निद्राव्यस्थेत जातात. या कालावधीत संपूर्ण सृष्टीचे पालन भगवान शंकरांकडून केले जाते. अशातच जाणून घेऊया जुलै महिन्यात कोणते सणवार साजरे केले जाणार याबद्दल सविस्तर.....
जुलै 2024 महिन्यातील सणवार
जुलै महिन्यातील तीन एकादशी महत्वाच्या
जुलै महिन्यात तीन एकादशींचा शुभ योग होत आहे. यामध्ये आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील योगिनी एकादशी (Yogini Ekadashi), देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi) आणि कामिका एकादशीचा (Kamika Ekadashi) समावेश आहे. देवशयनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णूंचा शयनकाळ सुरु होतो. हा दिवस अत्यंत खास असतो. देवशयनी एकादशीपासूनचे पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्ये केली जात नाही. असे मानले जाते की, त्या कार्यांमध्ये भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही.
आणखी वाचा :