पोटातील गॅसच्या समस्येने त्रस्त आहात? पाहा आजीच्या बटव्यातील हा खास उपाय

Published : Oct 04, 2024, 08:28 AM ISTUpdated : Oct 04, 2024, 08:36 AM IST
stomach pain and indigestion in summer must not be ignored know why

सार

Stomach Gas Home Remedy : पोटातील गॅस आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात. पण सातत्याने पोटात गॅस होण्याची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Stomach Gas Home Remedy : प्रत्येकाला स्वादिष्ट, चमचमीत पदार्थांचे सेवन करणे आवडते. घरी आईच्या हातचा एखादा पदार्थ किंवा हॉटेलमध्ये मिळणाऱ्या फूड्समुळे तोंडाला पाणी सुटणे सामान्य बाब आहे. अशातच कधीकधी ओव्हरइटिंगही केले जाते. काही वेळेस अत्याधिक प्रमाणात खाल्ल्यानेही पोट बिघडले जाते. हेल्दी राहण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे फार महत्वाचे असते. 

चुकीच्या खाण्यापिण्यामुळे पोटात गॅसची समस्या उद्भवू शकते. अशातच अपचन, मळमळ अशा अन्य समस्याही होऊ शकतात. पण तुम्हाला सातत्याने पोटात गॅस होत असेल, पदार्थ पचत नसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कधीकधी पोटात होणाऱ्या गॅस आणि अपचनाच्या समस्येवर घरगुती उपाय करू शकता. यावरच आजीच्या बटव्यातील पोटात गॅस होण्याच्या समस्येवरील एक खास उपाय पाहणार आहोत.

पोटातील गॅसच्या समस्येवर जीरे रामबाण उपाय

  • जीऱ्याच्या सेवनाने पोटाला थंडावा मिळतो.
  • जीरे शरिरातील डाइजेस्टिव्ह एंजाइम्सच्या सीक्रेशनलाही मदत करते. यामुळे अन्नपदार्थ पचले जातात आणि गॅसची समस्या दूर होते.
  • जीऱ्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असल्याने पोटाला सूज येण्याची समस्या दूर होते. याशिवाय पचनक्रिया सुधारली जाते.
  • खाल्ल्यानंतर पोट जड झाल्यासारखे वाटत असल्यास किंवा आंबट ढेकर येत असल्यास जीऱ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.
  • जीऱ्यामुळे पचनसंस्थेचे मसल्स रिलॅक्स करते. यामुळे पदार्थ सहज पचले जातात.
  • जीऱ्याच्या सेवनाने मेटाबॉलिज्म बूस्ट होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.
  • जीऱ्यामुळे पोट साफ होण्यासह बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.

जीऱ्याचे असे करा सेवन
सर्वप्रथम एका ग्लासमध्ये एक चमचा जीरे घ्या. यामध्ये चिमूटभर पिंक सॉल्ट घालून कोमट पाणीही घाला. यासाठी जीऱ्याच्या पावडरचाही वापर करू शकता. जीऱ्याच्या पाण्यात आवश्यक असल्यास मधही वापरु शकता. पोटातील गॅसची समस्या दूर करण्यासाठी आजीच्या बटव्यातील हा खास उपाय नक्कीच मदत करू शकते. तुम्हाला आरोग्यासंबंधित एखादी समस्या असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विसरु नका.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

घराला वाळवी लागलीय? हा मसाला करेल मदत

सणासुदीच्या काळात Overeating पासून दूर राहण्यासाठी खास टिप्स

PREV

Recommended Stories

Lip Care : हेल्दी आणि मऊसर ओठांसाठी लिपस्टिक लावण्यापूर्वी लावा या 4 गोष्टी
Christmas 2025 : 25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो ख्रिसमस? जाणून घ्या ही खास कथा