Samsung कंपनीचे हे दोन 5G स्मार्टफोन झालेत स्वस्त, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

तुम्हाला नवा धमाकेदार स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. सॅमसंग कंपनीचे दोन 5G स्मार्टफोनच्या किंमती कमी झाल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊया अधिक...

Samsung Smartphone : सॅमसंग कंपनीने आपले दोन 5G स्मार्टफोनच्या किंमतीत कमी केल्या आहेत. भारतात Samsung Galaxy M14 5G आणि Galaxy F14 5G स्मार्टफोनच्या किंमतीवर तुम्हाला भरघोस सूट मिळणार आहे. यामुळे तुम्हाला सॅमसंग कंपनीचे हे स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, सॅमसंग कंपनीची अधिकृत वेबसाइटसह ऑफलाइन स्टोअरमध्ये देखील खरेदी करता येणार आहे. सॅमसंग कंपनीने Samsung Galaxy M14 5G आणि Galaxy F14 5G स्मार्टफोन 2 हजार 500 रूपयांपर्यंत स्वस्त केले आहेत.

Samsung Galaxy M14 5G
सॅमसंग कंपनीचा Galaxy M14 5G स्मार्टफोनच्या 4GB+128GB व्हेरिएंटला कंपनीने 13 हजार 490 रूपयांत लाँच केले होते. पण कंपनीने याची किंमत एक हजार रूपयांनी कमी केली आहे. यामुळे स्मार्टफोन तुम्हाला 12 हजार 490 रूपयांना खरेदी करता येणार आहे. याशिवाय Galaxy M14 च्या 6GB+128GB स्मार्टफोन 14 हजार 990 रूपयांऐवजी 13 हजार 990 रूपयांना खरेदी करता येणार आहे.

Samsung Galaxy F14 5G
सॅमसंग Galaxy F14 च्या 4GB/128GB व्हेरिएंटला 14 हजार 490 रूपयांत लाँच केले होते. पण तुम्हाला स्मार्टफोन 2 हजार 500 रूपयांच्या सूटसह 11 हजार 990 रूपयांना खरेदी करता येणार आहेय याशिवाय Galaxy F14 च्या 6GB/128Gb स्मार्टफोनला 15 हजार 990 रूपयांत लाँच करण्यात आले होते. पण स्मार्टफोनची किंमत कमी झाल्यानंतर 13 हजार 490 रूपयांना खरेदी करता येऊ शकतो.

Samsung Galaxy F14 5G स्मार्टफोनचे फीचर्स

Samsung Galaxy F14 5G फीचर्स

आणखी वाचा : 

कमी बजेटमध्ये नवा फोन खरेदी करायचाय? Xiaomiच्या या तीन स्मार्टफोनचे पर्याय आहेत बेस्ट

WhatsApp वापरताना ही चूक करणे टाळा, नाहीतर बँक खाते होईल रिकामे

Tecno Pop 8 स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

Share this article