Ram Navami 2025 : यंदा रामनवमीला 3 दुर्मिळ योग, जाणून घ्या तारखेसह शुभ मुहूर्त

Published : Apr 03, 2025, 10:14 AM IST

Ram Navami 2025 : यंदा रामनवमी येत्या 6 एप्रिलला साजरी केली जाणार आहे. यावेळी तीन दुर्मिळ योग जुळून आले असल्याने रामनवमीचे महत्व अधिक वाढले गेले आहे. जाणून घेऊया रामनवमीच्या पूजेचा शुभमुहूर्त आणि अन्य सविस्तर माहिती...

PREV
14
श्रीराम नवमीचा उत्सव

प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. याच दिवशी चैत्र नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो. हिंदू धर्मामध्ये राम नवमीच्या सणाला विशेष महत्व आहे. खरंतर, अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो.

24
श्रीरामाची पूजा

श्रीराम नवमीच्या दिवशी रामाची स्तुती आणि पूजा केल्याने आयुष्यात सुख-शांती आणि समृद्धी येते. याशिवाय राम यांच्याकडून आपल्याला आदर्श, धर्म आणि कर्तव्यपूर्ण आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते. जाणून घेऊया. यंदाच्या रामनवमीवेळी आलेले तीन दुर्मिळ योग आणि शुभ मुहूर्त...

34
रामनवमी तारीख आणि शुभ मुहूर्त

पंचांगानुसार राम नवमी प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते. यंदा नवमी तिथीची सुरुवात 5 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी सुरू होणार असून 6 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजून 24 मिनिटांनी संपणार आहे. उदयतिथीनुसार, यंदा राम नवमीचा सण 6 एप्रिलला साजरा केला जाणार आहे.

44
राम नवमी 2025 शुभ योग

यंदा राम नवमीच्या दिवशी तीन दुर्मिळ योग जुळून आले आहेत. यामुळे श्रीराम नवमीच्या सणाचे महत्व अधिक वाढले गेले आहे. श्रीराम नवमीच्या दिवशी रवि पुष्य योग, सर्वार्थ सिद्धि योग आणि सुकर्मा योग जुळून आला आहे. या योगांना ज्योतिषमध्ये अत्यंत शुभ आणि लाभकारी मानले जाते. पूजा-प्रार्थना, व्रत-उपवास आणि नव्या कार्याच्या सुरुवातीसाठी हे योग लाभदायी ठरतात.

  • रवि पुष्य योग : सकाळी 6 वाजून 18 मिनिटांपासून ते 7 एप्रिल सकाळी 6 वाजून 17 मिनिटांपर्यंत
  • सर्वार्थ सिद्धि योग : संपूर्ण दिवस असणार आहे.
  • सुकर्मा योग : पहाटेपासून ते संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिटांपर्यंत

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Recommended Stories