उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे शरीराला थंडावा देते, पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि हाडे मजबूत करते. तसेच, दही शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते.
उन्हाळ्यातील उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते, दही हे नैसर्गिक कूलिंग एजंट आहे. रोज एक वाटी दही खाल्ल्यास शरीराला गारवा मिळतो आणि ऊष्माघात (Heat Stroke) टाळता येतो.
25
पचनक्रियेस मदत होते
दह्यात असलेले प्रोबायोटिक्स (गुड बॅक्टेरिया) पचन सुधारतात. ऍसिडिटी, अपचन आणि पोटाच्या जळजळीच्या तक्रारी दूर होतात.
35
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
दह्यातील चांगले जिवाणू (Lactobacillus) रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. उन्हाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.