लंचनंतर झोपे येते? वापरा या 4 टिप्स

Published : Apr 01, 2025, 03:57 PM IST

Tips to Control Sleepiness Post Lunch : दुपारच्या लंचनंतर बहुतांशजणांना झोप येऊ लागते. ही समस्या खासकरुन ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसोबत होते. पण यापासून दूर कसे रहावे याबद्दल जाणून घेऊ.

PREV
15
दुपारच्या जेवणानंतर झोप येते?

दुपारचे जेवण झाल्यानंतर बहुतांशजणांना झोप येऊ लागते. या स्थितीला फूड कोमा असे म्हटले जाते. पण तुम्हाला माहितेय का, जेवल्यानंतर लगेच झोप का येते? हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, जेवल्यानंतर आपल्या शरीरातील इन्सुलिनचा स्तर वाढला जातो. यामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि मेलाटोनिन नावाचे हार्मोन रिलीज होऊ लागतात. यामुळेच आपल्याला झोप येऊ लागते. यापासून दूर राहण्यासाठी काही टिप्स फॉलो करू शकता.

25
अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर प्या

दुपारच्या लंचपूर्वी अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर पिऊ शकता. यामुळे ब्लड शुगरचा स्तर नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे शरीरातील इन्सुलिनचा स्तर वाढला जात नाही. जेवणापूर्वी 20 मिनिटे आधी अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर प्या. हे पाण्यामध्ये मिक्स करुन प्यावे.

35
वॉक करा

लंचनंतर वॉक करावे. अथवा 15-20 मिनिटे वॉक केल्याने शरीराला उर्जा मिळते. याशिवाय शरीराला रक्तपुरवठा सुरळीत होतो.

45
शुद्ध तूपाचे सेवन करा

शुद्ध तूपाचे सेवन केल्यानेही शरीरातील इन्सुलिन वाढण्यापासून दूर राहता. अशातच लंचमध्ये पोळीला शुद्ध तूप लावून खाऊ शकता.

55
सॅलडचे सेवन करा

लंचसोबत सॅलडचे सेवन करू शकता. यामधील फायबर पचनक्रिया मंद गतीने करते. याशिवाय इन्सुलिनही वाढले जात नाही. हिरव्या पालेभाज्या आणि कच्या भाज्यांमुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Recommended Stories