नीता अंबानींची गुलाबी साडी आहे खास, हातमागावर विणण्यासाठी लागलेत ऐवढे दिवस
जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी नेहमीच लाइमलाइटमध्ये असतात. नुकत्याच लेकाच्या लग्नातील लुकमुळे नीता अंबानी यांची जगभरात चर्चा झाली. अशातच आता एनएमएसीसीच्या एका सोहळ्यावेळी नीता अंबानींनी नेसलेल्या साडीची चर्चा सुरू झालीय.
Chanda Mandavkar | Published : Apr 2, 2024 10:22 AM / Updated: Apr 02 2024, 10:37 AM IST
NMACC ची वर्षपूर्ती
नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरला एक वर्ष पूर्ण झाले. यासाठी एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यासाठी 670 कलाकारांनी 700 हून अधिक शो केले. हे पाहण्यासाठी लाखो जणांनी उपस्थिती लावली होती.
नीता अंबानींचा लुक
NMACC च्या वर्षपूर्तीनिमित्त नीता अंबानी यांच्या रॉयल लुकने सर्वांच्या नजरा वळवल्या. यावेळी नीता अंबानींनी गुलाबी रंगातील खास साडी नेसली होती.
सिंपल ब्लाऊजसोबत नेसली साडी
नीता अंबानी यांनी गोल्डन रंगातील जरी वर्क असणाऱ्या गुलाबी रंगातील मलबरी साडी नेसली होती. या साडीवर सिंपल ब्लाऊज पेअर केले होते.
हातमागावर तयार करण्यात आलीय साडी
नीता अंबानी यांची मलबरी सिल्क साडी हातमागावर तयार करण्यात आली आहे. या साडीला तयार करण्यासाठी 40 दिवस लागल्याचे बोलले जात आहे.
नीता अंबानींच्या साडीची खासियत
नीता अंबानींच्या गुलाबी रंगातील साडी अत्यंत खास आहे. साडी रेशमाच्या धाग्यांनी तयार करण्यात आली आहे. या साडीसाठी खास रंगांचाही वापर करण्यात आलाय.
नीता अंबानींची ज्वेलरी
नीता अंबानींनी गुलाबी सिल्क साडीवर एक मोठा पाचूचा हार घातला होता. यामुळे नीता अंबानी रॉयल आणि एलिगेंट दिसत होत्या.