Health Care : तुम्हीही आंबट ढेकरांच्या समस्येमुळे आहात हैराण? जाणून घ्या रामबाण नैसर्गिक उपाय

Health Care Tips : आंबट ढेकरांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय शोधताय? मग ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

 

Chanda Mandavkar | Published : Nov 27, 2023 11:46 AM IST / Updated: Nov 27 2023, 05:19 PM IST

17
आंबट ढेकरांच्या समस्येवर उपाय

Acidic Burp Home remedies: जेवल्यानंतर कधीकधी आपल्याला ढेकर येतात. ढेकर येणं ही सामान्य बाब आहे. पण काही वेळेस आंबट ढेकर येऊ लागतात. यामागील कारण म्हणजे गरजेपेक्षा अधिक खाणे, अधिक तेलकट-तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर एकाच ठिकाणी बसणे. यामुळे अपचनाची समस्या उद्भवते व आंबट ढेकर येऊ लागतात.

आंबट ढेकर येण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकता. किचनमधील काही गोष्टी तुम्हाला आंबट ढेकर येण्याच्या समस्येपासून दूर ठेवू शकतात. याबाबत जाणून घेऊया अधिक माहिती...

27
बडिशेप

आंबट ढेकर येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण बडिशेपचे पाणी पिऊ शकता. बडिशेपमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यातील औषधी गुणधर्मांमुळे अन्नपदार्थांचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा बडिशेप मिक्स करा व गॅसच्या मंद आचेवर पाणी गरम करण्यास ठेवा. यानंतर गॅस बंद करून बडिशेपचे पाणी थंड होऊ द्यावे. पाणी थंड झाल्यानंतर ते गाळून प्यावे.

37
लिंबू पाणी आणि सैंधव मीठ

लिंबू पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. आंबट ढेकर येत असल्यास लिंबू पाण्यात सैंधव मीठ मिक्स करून प्यावे. आंबट ढेकरांच्या समस्येवर हे पेय रामबाण उपाय आहे. लिंबूमध्ये अ‍ॅसिडिक गुणधर्म आहेत, यामुळे आंबट ढेकर येण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. पोटाशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी फार पूर्वीपासून लिंबू पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

47
सैंधव मीठ आणि जीरे पावडर

सैंधव मीठ व भाजलेल्या जिऱ्याची पावडर खाणे, आंबट ढेकरच्या समस्येवर फायदेशीर ठरू शकते. जीरे आणि सैंधव मिठामुळे शरीराची पचनक्रिया सुरळीत पार पडण्याची मदत मिळू शकते. यामुळे शौचाशी संबंधित समस्याही कमी होऊ शकतात. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा सैंधव मीठ मिक्स करून हे पेय प्यावे. यामुळे आंबट ढेकरच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळेल. (Ambat dhekarvar gharguti upaay)

57
हिंग

हिंग हे अँटी-ऑक्सिडेंट्सचे उत्तम स्त्रोत मानले जाते. अन्नाचे पचन सहजरित्या होण्यासाठी अँटी-ऑक्सिडेंट्सची मदत होते. खाद्यपदार्थांमध्ये योग्य प्रमाणात हिंग मिक्स केल्यास शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळेल. ज्यामुळे आंबट ढेकराची समस्या हळूहळू कमी होईल. कोमट पाण्यात हिंग मिक्स करूनही हे पेय आपण पिऊ शकता. याशिवाय चिमूटभर हिंग जीभेवर ठेवावी व त्यानंतर गरम पाणी प्यावे, हा उपायही आंबट ढेकरांच्या समस्येवर रामबाण ठरू शकतो.

67
ओवा

ओव्यामध्ये कित्येक औषधी गुणधर्म असतात. ओव्यामध्ये थायमोल नावाचे कम्पाऊंड (Thymol), अँटी-बॅक्टेरियल यासारख्या घटकांचा समावेश आहे. हे घटक तोंड तसेच पोटाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. पोटाशी संबंधित आजार तसेच आंबट ढेकर येणाच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी आयुर्वेदाचार्यही ओव्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे पोट, ओटपोटी व छातीत होणारी जळजळ, पोटदुखी यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.

आणखी वाचा: 

White Hair Solution : पांढऱ्या केसांपासून हवीय मुक्तता? मग करा हे आयुर्वेदिक उपाय

Fasting Benefits : उपवास करण्याचे हे आहेत 8 अद्भुत फायदे

भुजंगासनामुळे सुटलेले पोट कमी होण्यासह आरोग्यास मिळतील हे 9 लाभ

77
तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share this Photo Gallery
Recommended Photos