Hair Care Tips: ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवताय? होऊ शकतात हे मोठे नुकसान

Beauty Tips : ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवल्यास केसांवर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात, जाणून घेऊया सविस्तर माहिती…

 

Chanda Mandavkar | Published : Nov 25, 2023 5:24 PM
15
केसांची अशी घ्या काळजी

Hair Care Tips : केसांमधील गुंता सोडवण्यासाठी तसेच हेअरस्टाइल करताना कंगव्याचा वापर केला जातो. योग्य पद्धतीने कंगवा केसांत फिरवल्यास केसांच्या टेक्श्चरमध्ये सुधारणा होऊ शकते. केसांशी संबंधित समस्याही दूर होण्यास मदत मिळू शकते, हे तुम्हाला माहितेय का?

चुकीच्या पद्धतीने कंगव्याचा वापर केल्यास केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. केसांमध्ये कंगवा फिरवताना कोणती काळजी घ्यावी तसेच केस ओलसर असताना कंगवा का करू नये? जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती…

25
ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवणे टाळा

केस ओले असताना कंगवा केल्यास केसांच्या मुळांचे प्रचंड नुकसान होते. कारण हेअरवॉश केल्यानंतर स्कॅल्पवरील रोमछिद्रे मोकळी होतात. अशा स्थितीत कंगवा (combing wet hair loss)केल्यास केस तुटण्याची शक्यता अधिक असते. तसेच केसांची घनताही कमी होऊ शकते. या समस्या टाळण्यासाठी केस कोरडे झाल्यानंतरच कंगवा करावा.

35
कंगवा करण्याची योग्य पद्धत

ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवण्याची चुक कधीही करू नये. केस कोरडे झाल्यानंतर कंगवा करण्यापूर्वी हेअर सीरम लावावे. यामुळे केस मऊ होतील. शक्य असल्यास केसांसाठी लाकडाचा कंगवा वापरावा. यामुळे केसांच्या भागातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. महत्त्वाचे म्हणजे केसांमध्ये अधिक गुंता झाला असल्यास बोटांच्या मदतीने गुंता सोडवावा.

45
ओले केस बांधावेत का?

केस ओले असताना कधीही बांधू नये. ओले केस पोनीटेल स्टाइल पद्धतीने बांधल्यास केस तुटण्याची शक्यता अधिक असते. तसंच काही जण केस ओलसर असतानाच काही प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण तुमच्या या सवयीमुळे केसांचे खूप नुकसान होत आहे, हे लक्षात घ्या. हेअर स्प्रे किंवा हेअर जेल यासारखे प्रोडक्ट्स शक्यतो केस कोरडे झाल्यानंतरच वापरावेत.

आणखी वाचा: 

झटपट वजन कमी करायचंय? मग आजच घरात लावा हे 7 औषधी वनस्पती

Hair Growth Tips : केसगळतीपासून ते कोंड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, केसांसाठी वापरा ही हिरवीगार पाने

Fasting Benefits : उपवास करण्याचे हे आहेत 8 अद्भुत फायदे

55
तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share this Photo Gallery
Recommended Photos