Flat Feet Side Effects : महिला आपण सुंदर दिसावे म्हणून प्रत्येक लहान-लहान गोष्टींकडे लक्ष देतात. सर्वसामान्यपणे त्या कपडे, ज्वेलरी, मेकअप, हेअरस्टाइसह फुटवेअर कोणत्या स्टाइलची असावी याकडेही अधिक लक्ष देतात. काही महिलांना आपण घातलेल्या फुटवेअरच्या माध्यमातून स्टाइल स्टेंटमेंट क्रिएट करणे आवडते.
फुटवेअर केवळ स्टाइलसाठी असतात, असे काही जणींना वाटते. मात्र त्या पायात घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटते का? हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. महिला मॅचिंग फुटवेअर खरेदी करतात. पण त्याची निवड करताना पायांचा आकार कसा आहे? हे पाहावे. चुकीचे फुटवेअर पायासह संपूर्ण आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात.
योग्य आकाराचे फुटवेअर वापरल्यास पायाचे हाड वाढणे, कंबरदुखी, गुडघेदुखी तसंच चालण्याचे वळणच पूर्णतः बिघडू शकते. पाय व गुडघेदुखीची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी काही जणी फ्लॅट फुटवेअर वापरण्यास प्राधान्य देतात. पण हाय हिल्सपेक्षा फ्लॅट फुटवेअरमुळे केवळ पायांवर नव्हे तर संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम होताहेत. जाणून घेऊया याबाबत सविस्तर व महत्त्वपूर्ण माहिती…