सुटलेल्या पोटामुळे त्रस्त आहात का? तर मग नियमित भुजंगासनाचा सराव करा. या आसनामुळे पोटाचे स्नायू ताणले जातात. ज्यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते.
Lifestyle Nov 17 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:Getty
Marathi
फुफ्फुसांचे आरोग्य राहील निरोगी
भुजंगासनामुळे फुफ्फुसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी व त्यांची क्षमता वाढण्यासाठी मदत मिळू शकते.
Image credits: Getty
Marathi
खांदेदुखी व मानदुखी होते कमी
भुजंगासनामुळे शरीराचे स्नायू ताणले जातात. यामुळे खांदे, पाठ आणि मानेसह संपूर्ण शरीरास आराम मिळतो व या अवयवांवरील ताण देखील कमी होतो.
Image credits: Getty
Marathi
पाठीचा कणा होतो मजबूत व लवचिक
भुजंगासनाच्या सरावामुळे पाठ व पोटाच्या भागास प्रामुख्याने लाभ मिळतात. यामुळे पाठीचा कणा लवचिक होण्यास मदत मिळते.
Image credits: Getty
Marathi
नितंबाचे स्नायू होतात मजबूत
नितंबाचे स्नायू मजबूत होण्यासाठी नियमित भुजंगासनाचा अभ्यास करावा. यामुळे कंबरदुखीही कमी होऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
चयापचयाची क्षमता सुधारते
भुजंगासनाच्या सरावामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारण्यास मदत मिळते. यामुळे पोटाशी संबंधित समस्याही कमी होतात.
Image credits: Getty
Marathi
तणाव होतो कमी
शारीरिक व मानसिक तणाव कमी करायचा असल्यास नियमित भुजंगासनाचा सराव करावा. यामुळे थकवा, शारीरिक कमकुवतपणा, डोकेदुखी, स्तुती यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
Image credits: Getty
Marathi
सायटिकाच्या वेदना होतील कमी
भुजंगासनाच्या सरावामुळे सायटिकाच्या दुखण्यातून मुक्तता मिळू शकते. कारण या आसनामुळे पायांच्या नसांवर सकारात्मक परिणाम होतो.
Image credits: Getty
Marathi
यकृत व किडनीच्या आरोग्यासाठी लाभदायक
भुजंगासनामुळे पोटाच्या भागातील अवयवांवर सकारात्मक परिणाम होतात. यकृत व किडनीच्या आरोग्यासही हे आसन उपयुक्त आहे. भुजंगासनामुळे रक्तप्रवाह देखील सुधारतो.
Image credits: Getty
Marathi
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.