Fasting Benefits : उपवास करण्याचे हे आहेत 8 अद्भुत फायदे
योग्य पद्धतीने उपवास केल्यास त्याचे सकारात्मक फायदे शरीराच्या पचनसंस्थेस लाभतील. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतील.
उपवास केल्याने शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यास मदत मिळेल. शिवाय फराळात द्रवपदार्थाचा समावेश केल्यास पचनसंस्थेचे कार्य सुधारते.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार उपवास केल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते. यासाठी खाण्यापिण्याच्या वेळांचे काटेकोरपणे पालन करावे.
आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचाही त्वचेवर सकारात्मक-नकारात्मक परिणाम होतो. उपवास केल्यास शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातील. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.
उपवास केल्यास उच्च रक्तदाबाची समस्याही नियंत्रणात राहील. केवळ यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उपवासामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळेल. शिवाय शरीरातील अतिरिक्त फॅट्सही कमी होतील.
आरोग्यवर्धक खाद्यपदार्थांचा फराळात समावेश करून उपवास केल्यास शरीरातील पेशी स्वच्छ करण्याची क्षमता सुधारते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
सात्विक आहारामुळे मानसिक आरोग्यही सुधारते. यामुळे चिंता, ताणतणाव व निद्रानाश यासारख्या समस्याही दूर होण्यास मदत मिळते.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.