Relationship Tips: पार्टनरसोबत पैशांवरून वाद होतात का? या टिप्स येतील कामी

नवरा-बायकोमध्ये बहुतांशवेळा पैशांवरुन वाद होतात. हा वाद पगार असो किंवा घरखर्च यावरुन होतोच. तुमच्या घरात देखील असेच होते का? यावर उपाय म्हणून काही सोप्या टिप्स नक्कीच फॉलो करू शकता.

 

Chanda Mandavkar | Published : Nov 25, 2023 2:46 PM / Updated: Nov 25 2023, 03:15 PM IST
17
नात्यात पैशांवरून होणारे वाद

Relationship Tips: सध्याच्या बदललेल्या आयुष्यात नात्यांपेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्याला अधिकाधिक पैसा कसा कमावता येईल यामागे पळतोय. परंतु याचा खासगी आयुष्यातील काही नात्यांवर परिणाम होत असल्याचे दिसून येते. प्रत्येक घरात नवरा-बायकोच्या नात्यात पैशांवरून छोटे-मोठे वाद होताना दिसतात.

घर खर्च असो किंवा बचत करणे असो, प्रत्येक व्यक्तीचे मनी मॅनेजमेंट वेगवेगळे असते. काही वेळेस पैशांमुळे होणारा वाद एवढा टोकाला जातो की, पार्टनरसोबत सतत यावरून भांडण होण्यास सुरूवात होते. तुम्ही देखील पैशांमुळे होणाऱ्या वादावर तोडगा शोधताय? काही साध्या सोप्या टिप्स फॉलो केल्यास पैशांची बचतही होईल व यामुळे होणारे वादही कमी होतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती…

27
पार्टनरसोबत आर्थिक व्यवहाराबाबत स्पष्टपणे चर्चा करा

पार्टनरसोबत आर्थिक व्यवहाराबाबत स्पष्टपणे चर्चा होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपापसातील मतभेद दूर सारून पैशांचे योग्य पद्धतीने नियोजन कसं करता येईल यासाठी एकत्रितपणे तोडगा काढावा. दोघांनी मिळून पैशांचे मॅनेजमेंट कसे करता येईल याचाही विचार करावा. जेणेकरून भविष्यात एकमेकांवर दोष लावण्याचे प्रकार उद्भवणार नाहीत. संवादामुळे काही आर्थिक व्यवहारांमध्ये एकमेकांवर येणारा खर्चाचा भार कमी होण्यास मदत मिळू शकते. (Money issue with partner)

37
प्लानिंग करा

बहुतांश लोक पार्टनरचे मत विचारात न घेता किंवा कोणतीही माहिती शेअर न करता स्वत:च्याच मर्जीने  हवा तसा पैसा खर्च करतात. पण लक्षात ठेवा लग्नानंतर तुम्ही एका परिवाराचा भाग झालेले असता. त्यामुळे कोणत्या गोष्टीवर किती खर्च करायचा आहे याबाबत आपल्या पार्टनरसोबत संवाद साधून पैशांचे नियोजन करावे. एकट्याने निर्णय घेणं टाळावे. 

47
मनी गोल्स ठरवा

दोघांनी मिळून भविष्यासाठीचे मनी गोल्स सेट करावेत. यामुळे बचत देखील होईल आणि पैशांवरून नात्यात वाद होणार नाहीत. बचतीसाठी शासनाच्या तसेच खासगी स्वरूपातील  काही योजना उपलब्ध आहेत त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. उदाहरणार्थ, म्युचअल फंड, शेअर मार्केट, पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक इत्यादी.

57
पार्टनरचे मत जाणून घ्या

पार्टनरचे मनी मॅनेजमेंटबद्दलचे काय मत आहे, हे जाणून घ्या. एकट्यानेच पैशांबद्दल निर्णय घेणे टाळा. दोघांनी मिळून किती खर्च करावा, किती पैसे बचत करावेत याबद्दल देखील एकमेकांशी बोलावे. समोरच्या व्यक्तीचे मत पूर्णपणे ऐकून घेतल्यानंतर तुम्ही स्वत:चे मत मांडा. पार्टनरचे मत पटत नसेल तर त्याला पैशांची काही गणिते समजावून सांगा. (Partner sobat pishyanvarun vaad)

67
बँकेत संयुक्त खाते सुरू करा

पार्टनरसोबत पैशांवरुन सतत वाद होत असतील तर आखणी एक उपाय म्हणजे बँकेत एक संयुक्त खाते सुरू करा. जेणेकरून दोघांनी या खात्यात प्रत्येक महिन्याला किती रक्कम टाकायची हे ठरवून बचत करू शकता. यामुळे पैशांचे नियोजन उत्तमरित्या होण्यास मदत मिळू शकते. विविध बँका यासाठी व्याजदर देखील उत्तम देते. 

आणखी वाचा: 

Payment Tips: QR कोडच्या मदतीने पेमेंट करताना 'या' स्मार्ट टिप्स नक्की वापरा, कारण…

Threads Big Update : इंस्टाग्रामला गुडबाय न म्हणता आता थेट डिलीट करू शकता Threads Account

Habits Of Successful People : आयुष्यात तुम्हालाही व्हायचंय यशस्वी? मग फॉलो करा या 6 सवयी

77
तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share this Photo Gallery
Recommended Photos