Beauty Tips : महागडे प्रोडक्ट वापरूनही मेकअप लुक परफेक्ट दिसत नाही? मग तुम्ही करताय या गंभीर चुका

मेकअप केल्याने आपले सौंदर्य अधिक खुलून दिसते. परंतु मेकअप करताना काही चुका केल्यास तुमचा संपूर्ण लुक बिघडू शकतो. यामुळे परफेक्ट लुकसाठी पुढील काही टिप्स लक्षात ठेवा.

Chanda Mandavkar | Published : Nov 25, 2023 4:23 PM / Updated: Nov 25 2023, 04:35 PM IST
17
मेकअप करताना 'या' चुका टाळा

Beauty Tips : महिलांना मेकअप करायला फार आवडते. यासाठी महागडे ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी केले जातात. काही वेळेस महागडे प्रोडक्ट्स खरेदी करून मनासारखा मेकअप होत नाही आणि लुक बिघडला जातो. याच कारणास्तव काही महिला घरच्या घरी मेकअप करण्याऐवजी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करणे पसंत करतात.

मोठ्या-महागड्या ब्रॅण्डचे ब्युटी प्रोडक्ट्स आपण वापरत असाल, पण तुमच्याच काही चुकांमुळे लुक बिघडतोय; हे लक्षात घ्या. सिनेमांमधील हिरोईन्ससारखा परफेक्ट लुक हवा असेल तर मेकअप करताना काही साध्या-सोप्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे. मेकअप करताना कोणत्या चुका करणे टाळलं पाहिजे, जाणून घेऊया अधिक माहिती…

27
मॉइश्चराइझर न लावणे

काही जणी मेकअप करण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याला मॉइश्चराइझर लावत नाहीत. कारण त्यांना असे वाटते मॉइश्चराइझर लावल्याने चेहरा तेलकट होईल. खरंतर मॉइश्चराइजर लावल्याने त्वचेवर ओलसरपणा टिकून राहतो आणि मेकअपचा बेस व्यवस्थितीत ब्लेंड होतो.

37
चुकीचे फाउंडेशन निवडणे

मेकअपचा पहिला बेस फाउंडेशन असतो. यामुळे नेहमीच उत्तम गुणवत्तेचे फाउंडेशन खरेदी करावे.स्किन टोनला मॅच होईल असे फाउंडेशन निवडावे.त्वचेचा रंग गडद असेल आणि फिकट रंगाचे फाउंडेशन निवडल्यास ते चेहऱ्यावर अधिक दिसेल. यामुळे मेकअप करण्यासाठी जर योग्य फाउंडेशन निवडायचे झाल्यास ज्या ठिकाणाहून ते खरेदी करत आहात तेथील ब्युटी एक्सपर्ट्सची मदत घेऊ शकता.

47
ब्लेंड करण्याची योग्य पद्धत

मेकअपला ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडरचा वापर केला जातो. ब्युटी ब्लेंडर हे विविध आकाराचे येतात. यामुळे मेकअप करताना योग्य ब्युटी ब्लेंडर खरेदी करा. तुमच्याकडे असलेला ब्युटी ब्लेंडर तुम्ही अयोग्य पद्धतीने वापरल्यास तुमचा लुक बिघडू शकतो. त्याचसोबत चेहऱ्यावर फाउंडेशनचे चट्टे दिसून येऊ शकतात. ब्युटी ब्लेंडर वापरताना एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे, तो हलका ओलसर करून घ्यावा. जेणेकरुन तुमचे फाउंडेशन व्यवस्थितीत चेहऱ्यावर सेट होण्यास मदत होईल.

57
मेकअपचा लुक बिघण्याचे कारण

मेकअपचा बेस लावताना तो एकदाच व्यवस्थितीत ब्लेंड करून घ्यावा. दुसऱ्यांदा लेअर लावण्याची चुक करू नका. कारण काही वेळानंतर तुमच्या मेकअपला केकी लुक (How To Avoid Cakey Makeup) येऊ शकतो. म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावर ब्युटी प्रोडक्ट्समुळे सुरकुत्या दिसू शकतात. ज्यामुळे संपूर्ण लुक अतिशय वाईट दिसतो.

67
लिपस्टिक लावताना घ्या काळजी

संपूर्ण मेकअप करून झाल्यानंतर शेवटी लिपस्टिक लावावी. मेकअप तसंच त्वचेच्या रंगाला साजेशी अशी लिपस्टिकच्या शेडची निवड करावी. लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना थोडसं मॉइश्चराइझर लावा. त्यानंतरच लिपस्टिक लावा.

आणखी वाचा: 

Winter Skin Care : कोरड्या त्वचेच्या समस्येतून हवीय सुटका? हिवाळ्यात असे फॉलो करा रुटीन

White Hair Solution : पांढऱ्या केसांपासून हवीय मुक्तता? मग करा हे आयुर्वेदिक उपाय

Fashion Tips: पेस्टल आउटफिट्सवर स्टायलिश लुकसाठी अशी निवडा ज्वेलरी

77
Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share this Photo Gallery
Recommended Photos