हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणालाही महत्त्व आहे. या दिवसापासून हिंदू नवीन वर्षाची सुरूवात होते. खरंतर, संपूर्ण भारतात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. पण महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा एक वेगळाच उत्साह दिसून येतो.
Gudi Padwa 2024 : धर्म ग्रंथांनुसार हिंदू नवर्षाची सुरूवात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. गुढीपाडव्याचा सण देशभरात वेगवेगळ्या नावाने आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. गुढीपाडव्यामधील गुढीचा अर्थ असा होतो की, विजयाचा ध्वज. अशातच गुढीपाडव्यासंदर्भात काही धार्मिक मान्यता आणि परंपरा आहेत. जाणून घेऊया यंदा गुढीपाडव्याचा सण कधी साजरा केला जाणार आणि शुभ मुहूर्त काय याबद्दल सविस्तर....
यंदा गुढीपाडवा कधी?
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार यंदा गुडीपाडव्याचा सण शुक्ल पक्षातील प्रतिपदा 8 एप्रिलपासून रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुरूवात होणार असून 9 एप्रिलला रात्री 8 वाजून 31 मिनिटांनी संपणार आहे. चैत्र प्रतिप्रदेच्या तिथीचा सुर्योदय 9 एप्रिल (मंगळवारी) होणार आहे. यामुळे यंदाच्या वर्षी गुढीपाडवा 9 एप्रिलला साजरा केला जाणार आहेय या दिवसापासून हिंदू नववर्ष 2081 देखील सुरू होणार आहे.
का साजरा केला जातो गुढीपाडव्याचा सण?
पौराणिक कथांनुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी सृष्टीची रचना ब्रम्हदेवांनी केली होती. यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हदेवांचे विशेष महत्त्व आहे. आणखी एका मान्यतेनुसार, या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांनाचा युद्धात पराभव केला होता. यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्त असे म्हटले जाते की, वाईट गोष्टींचा अंत होऊन आयुष्यात सुख-समृद्धी येते.
गुढीपाडव्याच्या सणासाठी पूजा-विधी
दरम्यान, गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. घराला सजवण्यासह पाहुणे मंडळींना घरी जेवणासाठी आमंत्रित केले जाते. या दिवशी खासकरून पुरण पोळी आणि श्रीखंड-पुरीचा बेत केला जातो. याशिवाय गुढीपाडव्याच्या एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
भारतातील या प्रांतात कशी साजरी करतात होळी? त्यामागील कथा काय सांगतात जाणून घ्या
Chandra Grahan 2024 : रंगपंचमी दिवशी असणार चंद्र ग्रहण, सणावर होणार का परिणाम?
Holashtak 2024 : यंदा होलाष्टक कधी? या काळात शुभ कार्य करणे असते वर्ज्य