Microwave Oven Cleaning Tip : मायक्रोव्हेव ओव्हन स्वच्छ करण्यासाठी लिंबूच्या सालचा असा करा वापर, दिसेल नवा आणि चमकदार (Watch Video)

जेवण बनवताना लिंबूचा वापर आपण सर्वजण करतो. खरंतर, लिंबूचा वापर केल्यानंतर आपण फेकून देतो. अशातच तुमच्या घरी मायक्रोव्हेव ओव्हन असल्यास तो स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला लिंबाची साल कामी येणार आहे.

Microwave Oven Cleaning Tip : आजकाल मायक्रोव्हेव ओव्हनचा वापर सर्वच घरांमध्ये केला जातो. अन्नपदार्थ गरम करणे ते एखादा पदार्थ तयार करण्यासाठी ओव्हनचा वापर केला जातो. पण अन्नपदार्थ गरम करताना किंवा तयार करताना त्याचे शिंतोडे ओव्हनच्या आतमध्ये उडले जातात. यामुळे ओव्हन आतमधून अस्वच्छ होते. अशातच मायक्रोव्हेव ओव्हनची वेळोवेळी स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे आहे. ओव्हन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालचा कशाप्रकारे वापर करू शकता याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....

लिंबूच्या सालने करा मायक्रोव्हेव ओव्हनची स्वच्छता
लिंबूची साल वापरून तुम्ही मायक्रोव्हेव ओव्हन स्वच्छ करू शकता. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर लिंबाच्या सालीचा वापर करून मायक्रोव्हेव ओव्हन स्वच्छ करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे. यासाठी सर्वप्रथम मायक्रोव्हेवच्या एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. यामध्ये एक चमचा डिश वॉश लिक्विड, अर्ध चमचा लिंबाचा रस आणि लिंबाच्या काही साल मिक्स करा.

आता भांड्यातील मिश्रण पाच मिनिटांसाठी मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये गरम करण्यासाठी ठेवा. पाच मिनिटानंतर मायक्रोव्हेव ओव्हनच्या आतमधील भाग एका स्वच्छ कापडाने पुसून घ्या.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
सोशल मीडियावर मायक्रोव्हेव ओव्हन स्वच्छ करण्याची पद्धत पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, "मी दररोज सकाळी मायक्रोव्हेव स्वच्छ करण्यासाठी तुम्ही दाखवलेला उपाय करते." दुसऱ्या युजरने म्हटले की, "आपण इलेक्ट्रॉनिक सामान किंवा अन्य गॅजेटही लिंबाच्या सालीचा वापर करून स्वच्छ करू शकतो का?"

आणखी वाचा : 

Overthinking : डोक्यातील सततच्या विचारांनी ग्रासले असाल तर हे नक्की वाचा

चुकीचे ऑनलाइन प्रोडक्ट घरी आलेय? कंपनी रिफंडही देत नाहीय तर का हे काम

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका अधिक आताच जाणून घ्या कशामुळे होतं ? आणि त्यासाठी उपाय कोणते

Share this article