महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या सणाच्या एक दिवस आधी भोगीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भोगीची भाजी विशेष करून घरोघरी तयार केली जाते. पण भोगी का साजरी करतात हे माहितेय का?
Chanda Mandavkar | Published : Jan 11, 2024 6:45 PM / Updated: Jan 12 2024, 03:04 PM IST
भोगीचा सण
भोगीच्या सण 'उपभोगाचा सण' म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात साजरा केला जातो. तमिळनाडूत या सणाला 'भोगी पोंगल' असे म्हटले जाते. येत्या 14 जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे.
भोगीचा अर्थ
भोगीचा अर्थ उपभोग घेणारा असा होतो. या दिवशी दाराबाहेर सुंदर रांगोळी काढली जाते. याशिवाय नवीन वस्र परिधान केले जातात.
भोगीचे महत्त्व
भोगीच्या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. याशिवाय इंद्र देवाची पूजा केली जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते.
भोगी सणाची वेगवेगळी नावे
आसाममध्ये भोगी सणाला 'भोगली बहू', राजस्थानमध्ये 'उत्तरावन' आणि पंजाबमध्ये 'लोहिरी' नावाने ओळखले जाते.
भोगीची भाजी
भोगीची दिवशी पावटे, गाजर, हरभरा, वांगी अशा भाज्यांची मिळून भाजी तयार केली जाते. याशिवाय मुगाची डाळ, तांदूळ मिक्स करून खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून भाकरी देखील केली जाते.
भोगी देणे म्हणजे काय?
भोगीच्या दिवशी सुवासिनी महिलांना घरी जेवणासाठी बोलावले जाते. महिलांना घरी येण्यास शक्य नसल्यास त्यांच्या घरी भोगीचा प्रसाद पाठवला जातो.
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.