Year 2024वर असणार शनिचा प्रभाव, जाणून घ्या अंकशास्रातील 24 क्रमांकाचे महत्त्व

नववर्ष सुरू झाले आहे. यंदाचे वर्ष हे काही राशींसाठी अत्यंत खास असणार असल्याचे ज्योतिष आणि अंकशास्रात सांगण्यात आले आहे. पण तुम्हाला माहितेय का, यंदाच्या वर्षातील (2024) अंक 24चे अंकशास्रात काय महत्त्व आहे? याबद्दलच जाणून घेऊया अधिक....

Chanda Mandavkar | Published : Jan 6, 2024 10:50 AM IST / Updated: Jan 06 2024, 04:24 PM IST
18
अंकशास्र आणि नववर्ष 2024

वर्ष 2024ची सुरुवात झाली आहे. यंदाचे वर्ष कसे असणार, कोणत्या ग्रहाचा सर्वाधिक प्रभाव आयुष्यावर पडणार अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. अशातच जाणून घेऊयात यंदाच्या वर्षात अंकशास्राबद्दल काय सांगण्यात आले आहे याबद्दल अधिक...

28
शनिचा 8 क्रमांकाशी संबंध

अंकशास्रानुसार, 2024 या वर्षाची फोड केल्यास म्हणजेच 2+0+2+4 याची बेरीज 8 येते. तर 8 हा क्रमांक शनि संबंधित आहे. यामुळे यंदाच्या वर्षावर शनिदेवाचा सर्वाधिक प्रभाव असणार आहे.

38
नैसर्गिक आपत्ती

शनिच्या प्रभावामुळे वर्ष 2024 मध्ये काही मोठ्या घटना घडू शकतात. राजकरणातील स्थिती चढ-उताराची असू शकते. याशिवाय शेजारील देशांमध्ये वादाची स्थिती निर्माण होईल आणि नैसर्गिक आपत्तीचे संकटही निर्माण होऊ शकते.

48
अध्यात्मिक क्षेत्रासाठी खास

यंदाच्या वर्षावर शनिचा प्रभाव असलयाने नागरिकांचा धर्म, पूजा-पाठवरील विश्वास वाढणार आहे. मंदिरांमध्ये भाविकांची अधिक गर्दी होऊ शकते. याशिवाय देशात-जगात काही मोठ्या मंदिरांचे बांधकाम देखील होऊ शकते.

58
शुभ अंक 24

अंकशास्रात 24 अंकाला अत्यंत शुभ मानले आहे. या अंकामुळे नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढण्यास मदत होऊ शकते. याशिवाय 24 अंक हा धनलाभासंबंधित देखील आहे.

68
24 अंकाचे महत्त्व

हिंदू धर्मात 24 अंकाला फार महत्त्व आहे. भगवान विष्णूंचे 24 अवतार, जैन धर्मातील 24 तीर्थंकर, आणि गायत्री मंत्रात देखील 24 अक्षरे आहेत. 

78
या कारणास्तवही खास आहे 24 अंक

सोन्याची शुद्धता ओखळण्यासाठी 24 कॅरेट शब्दाचा वापर केला जातो. याशिवाय दिवस-रात्रीमध्ये 24 तास आणि अशोक चक्रामध्ये 24 आरे असल्याने अंक 24 हा अत्यंत खास आहे.

आणखी वाचा : 

Makar Sankranti 2024 : वर्षभरात किती वेळा साजरी केली जाते संक्रांती?

वास्तुशास्रानुसार घरातील देव्हाऱ्याजवळ या वस्तू ठेवणे मानले जाते अशुभ

तुमच्या मोबाइल क्रमांकामध्ये आहेत हे 2 अंक? खर्च होतील अधिक पैसे

88
DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Photo Gallery