Payment Tips: तुम्हाला कधी एखाद्या लॉटरीसाठी क्युआर कोड मिळाला आहे का? तसंच फ्री मोबाइल रिचार्ज करण्यासाठी फ्रेंड्स ग्रुपमध्ये लिंक अथवा स्कॅनर शेअर करण्याचा मेसेज फोनवर मिळाला आहे का. तर मित्रांनो अशा ऑफर्सपासून जरा सावधच राहा. चुकूनही तुम्ही एखादा क्युआर कोड स्कॅन केलाच तर मग तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे होण्याची शक्यता आहे. तुम्ही वाचताय, ते अगदी बरोबर आहे. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास हे समस्या टाळणं नक्कीच शक्य आहे.
डिजिटलच्या युगात हल्ली सर्वचजण कॅशलेस व्यवहार करण्यावर भर देत आहेत. फक्त एक क्युआर कोड स्कॅन केला की आपल्या खात्यातून थेट दुसऱ्याच्या खात्यात पैशांचा व्यवहार करणं सोपे झाले आहे. पण या प्रक्रियांमध्ये धोके देखील तितकेच आहेत. कॅशलेस व्यवहार करताना कित्येकांची बँक खाती रिकामी झाल्याची प्रकरणं दर दिवशी समोर येत आहेत. म्हणूनच ऑनलाइन व्यवहार करताना कष्टाने कमावलेले पै-पै आपल्याच चुकांमुळे गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यासाठी काही साध्या-सोप्या टिप्स लक्षात ठेवणे गरजेचं आहे, जाणून घेऊया सविस्तर माहिती…