Pedicure At Home : ब्युटीपार्लरसारखे पेडिक्युअर घरीच करायचंय? फॉलो करा या STEPS

Beauty tips: चेहऱ्यासह पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर ट्रिटमेंट करतात. पण घरच्या घरी देखील पेडिक्युअर करू शकता. यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर...

Chanda Mandavkar | Published : Dec 1, 2023 8:00 AM IST / Updated: Dec 01 2023, 02:24 PM IST
16
ब्युटीपार्लरसारखे घरी करा पेडिक्युअर

Pedicure at home: चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसावे म्हणून महिला वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट करतात. यासाठी लाखो रुपये देखील खर्च करण्यास तयार असतात. पण हातापायांच्या सौंदर्याकडेही लक्ष दिले पाहिजे. याकडे लक्ष न दिल्यास तुमच्या एकूणच सौंदर्यात बाधा निर्माण होऊ शकते. म्हणजे विचार करा आपण केवळ चेहऱ्यासाठीच वेगवेगळे उपचार करत आहात, पण काळवंडलेल्या हात-पायांकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिले, तर चांगले दिसणार नाही ना? म्हणून हात-पायांनाही मॉइश्चराइझर क्रीम वगैरे लावा.

पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी पेडिक्युअर ट्रिटमेंट केली जाते. या ट्रिटमेंटसाठी काहीजणी पार्लरमध्ये जातात. पण तुम्ही कमी खर्चात घरच्या घरी देखील पेडिक्युअर करू शकता. यासाठी पुढील काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

26
नखांवरील नेलपॉलिश काढा
  • पेडिक्युअर करताना सर्वप्रथम पायांच्या नखांवरील नेलपॉलिश काढा. नेलपॉलिश काढण्यासाठी नेलपॉलिश रिमूव्हर अथवा अ‍ॅसिटोनचा वापर करू शकता
  • एसीटोन नसल्यास व्हिनेगर आणि संत्र्याचा ज्युस एकत्रित करून पायांची नखं स्वच्छ करू शकता
  • नखं कापल्यानंतर, नेल फाइलरच्या मदतीने नखांना आकार द्या
36
पायांवरील मृत त्वचा हटवा
  • एका पसरट टबमध्ये गरम पाणी सोडा
  • गरम पाण्यात लिंबाचे तुकडे आणि झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाका
  • टबमधील पाण्यात पाय ठेवावे
  • जवळजवळ 15-20 मिनिटांनंतर प्युमिक स्टोनच्या मदतीने पायाच्या टाचा स्वच्छ करा
  •  प्युमिक स्टोनच्या वापरामुळे टाचांवरील मृत त्वचा काढण्यास मदत मिळेल व टाचांच्या भेगांमध्ये जमा झालेली घाणही स्वच्छ होईल.
  • नखे क्लीनर आणि क्युटिकल पुशरच्या मदतीने स्वच्छ करा
  • लिंबाच्या तुकड्यांनी पायाला व्यवस्थितीत मसाज करा, यामुळे काळवंडलेली त्वचा दूर होईल

(टीप: पायांची त्वचा संवेदनशील असल्यास लिंबाच्या रसाचा वापर करणे टाळा)

46
पायांचा मसाज
  • आता दोन चमचे मध घेऊन त्यामध्ये मॉइश्चराइझर मिक्स करा
  •  पेडिक्युअरसाठी तयार करण्यात आलेले मिश्रण पायांना लावून थोडावेळ मसाज करा
  • मसाज केल्याने पायांना आराम मिळेल आणि पायाची त्वचा मऊ होईल
56
या टिप्स देखील पाहा
  • आठवड्यातून एकदा पायांना मसाज करा
  • पायातील नखांमध्ये घाण जमा झाल्यास ती स्वच्छ करा
  • पायांना मॉइश्चराइजर लावा
  • वाढलेली वेळोवेळी नखं कापा
  • पायांच्या बोटांचे सौंदर्य बिघडू नये म्हणून केमिकलयुक्त नेलपॉलिश लावणे टाळा

आणखी वाचा: 

Skin Care: थंडीमुळे त्वचा ड्राय झालीय? मऊ त्वचेसाठी करा हे उपाय

Lip Care Tips: काळवंडलेल्या ओठांमुळे बिघडतंय तुमचे सौंदर्य? करा हे नैसर्गिक उपाय

Feet Care Tips: फ्लॅट फुटवेअर वापरताय? तुमच्या आरोग्यावर होताहेत इतके गंभीर

66
तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share this Photo Gallery
Recommended Photos